|Saturday, April 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » वीज सेवा सुरळीत न झाल्यास कार्यालयाला टाळे ठोकणार!

वीज सेवा सुरळीत न झाल्यास कार्यालयाला टाळे ठोकणार! 

स्वाभिमानचा इशारा : वीज वितरण कार्यालयाला कोळपे ग्रामस्थांचा घेरावा

वार्ताहर / वैभववाडी:

तालुक्यातील वीज वितरण अधिकाऱयांच्या दुर्लक्षामुळे वीज सेवेचा खेळखंडोबा झाला आहे. वारंवार विजेचा लपंडाव सुरू असल्याने ग्राहकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. विद्युत सेवा सुरळीत न झाल्यास वीज वितरणच्या कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा स्वाभिमानचे जिल्हा उपाध्यक्ष नासीर काझी यांनी दिला आहे.

वैभववाडी स्वाभिमान पक्ष व कोळपे ग्रामस्थांनी येथील वीज वितरण कार्यालयाला घेरावा घालत अधिकारी मुल्ला यांना धारेवर धरले. ग्राहकांना दामदुप्पट वीज बिले आकारून ती भरूनही घेता. मग सेवा देण्यास टाळाटाळ का केली जाते? कर्मचाऱयांच्या जागा रिक्त, पाऊस खूप आहे, अशी कारणे यापुढे चालणार नाहीत. कारणे सांगत असाल तर वीज बिले भरू नका, असे लेखी द्या. वीज समस्या सोडविल्याशिवाय कार्यालय सोडणार नाही. अधिकाऱयांना कोंडून ठेवणार, असा आक्रमक पवित्रा स्वाभिमानच्या पदाधिकाऱयांनी घेतला. कोळपे येथील वायरमन कामात चालढकल करीत आहेत. ग्राहकांना ते उडवाउडवीची उत्तरे देतात. जबाबदारी झटकून ते चावडीवर गप्पा मारीत बसतात. त्यांची गावातून उचलबांगडी करावी, अशी मागणी कोळपे ग्रामस्थांनी केली. ही मागणी मान्य करीत गावात दुसरा वायरमन देण्याचे आश्वासन मुल्ला यांनी ग्रामस्थांना दिले.

गावागावात वीज वाहिन्यांवरील झाडी तोडण्याची मोहीम वीज वितरणने हाती घ्यावी. या मोहिमेत स्वाभिमानचे कार्यकर्ते सहकार्य करतील, असे आश्वासन तालुकाध्यक्ष अरविंद रावराणे यांनी दिले. प्रभारी कार्यकारी अभियंता भगत यांनी दूरध्वनीवरून ग्रामस्थांचे म्हणणे ऐकून घेत चार दिवसांत सेवा सुरळीत होईल, असे आश्वासन दिले. यावेळी उद्योजक विकास काटे, युवक अध्यक्ष हुसेन लांजेकर, बाबालाल लांजेकर, सरपंच रामदास पावसकर आदी उपस्थित होते.

Related posts: