|Saturday, March 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » राज्यातील सर्वात दुषित नद्यांमध्ये ‘वाशिष्ठी’

राज्यातील सर्वात दुषित नद्यांमध्ये ‘वाशिष्ठी’ 

चिपळूणसाठी धक्कादायक,

मात्र पाण्याची गुणवत्ता सरासरी मर्यादित

प्रदूषण नियंत्रण मंडळाचे स्पष्टीकरण

प्रतिनिधी /चिपळूण

पेंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अहवालानुसार देशात एकूण 317 नद्या प्रदूषित असून त्यामध्ये महाराष्ट्रातील 56 नद्यांचा समावेश आहे. धक्कादायक म्हणजे चिपळुणातील वाशिष्ठी नदीचा समावेश या दुषित नद्यांमध्ये झाला आहे. मात्र मात्र सद्यस्थितीत वाशिष्ठीच्या पाण्याची गुणवत्ता सरासरी मर्यादेत असल्याचे प्रदूषण नियंत्रण मंडळाने स्पष्ट केले आहे.

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या 2014 च्या अहवालानुसार राज्यातील 49 नद्या प्रदूषित होत्या, तर 152 ठिकाणी पाण्याचा दर्जा खालावलेला होता. आता दुषित नद्यांच्या संख्येत 56 पर्यंत वाढ झाली आहे. नद्या प्रदूषणाबाबत ‘वनशक्ती’ संस्थेच्यावतीने ऍड. गायत्री सिंह यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावरील सुनावणीदरम्यान मंगळवारी न्यायमूर्ती अभय ओक आणि न्यायमूर्ती रियाज छागला यांच्या खंडपीठाने राज्य सरकारच्या धोरण दिरंगाईमुळे नद्यांचे अस्तित्व धोक्यात आल्याचे ताशेरे ओढले. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्यावतीने ऍड. शर्मिला देशमुख यांनी नद्यांच्या स्थितीबाबतचा अहवाल न्यायालयात सादर केला.

नैसर्गिक स्रोत म्हणून नद्यांचे संरक्षण-संवर्धन करणे, नद्यांतील पाण्याचा दर्जा सुधारणे हे राज्य सरकारचे कर्तव्य आहे. मात्र नद्यांचे संरक्षण आणि संवर्धन करणारे धोरण 3 वर्षांपूर्वी रद्द करून त्यानंतर नवे धोरण आखण्यासाठी सरकारतर्फे काहीच हालचाली केल्या गेल्या नसल्याचेही न्यायालयाने सुनावले. त्यावर प्रदूषण रोखण्यासाठी सरकारतर्फे प्रयत्न केले जात असल्याचे सरकारच्यावतीने ऍड. मिलिंद मोरे यांनी न्यायालयाला सांगितले. या प्रकरणी

वाशिष्ठीची गुणवत्ता सरासरी मर्यादेत

2014 सालच्या केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अहवालानुसार जाहीर करण्यात आलेल्या 49 दुषित नद्यांमध्ये वाशिष्ठी नदीचा असलेला समावेश शहर परिसरातील नागरिकांसाठी धक्कादायक आहे. कोयना जलविद्युत प्रकल्पातून निघणारे अवजल हे या नदीचा मुख्य स्त्रोत आहे. या नदीतून शहरासह तसेच लोटे, खेर्डी, गाणेखडपोली या औद्यााsगिक वसाहतीसह रत्नागिरी गॅस पॉवर लिमिटेडला पाणी पुरवठा केला जातो. शासनाने प्रमुख नद्यांच्या व उपनद्यांच्या क्षेत्रात केलेल्या वर्गीकरणात चिपळुणातून वाहणाऱया वाशिष्ठी नदीचा समावेश वर्ग अ 2 या प्रवर्गात केला आहे. नदीच्या काठावर खेर्डी तसेच गाणे खडपोली औद्योगिक वसाहत आहे. या वसाहतीमध्ये पूर्वीचे जलप्रदूषणकारी दहा उद्योग सुरू आहेत. या उद्योगातून निघणारे सांडपाणी प्रथम व व्दितीय स्तरीय प्रक्रिया करून पुनर्प्रक्रियेसाठी उद्योगात वापरले जाते. उद्योगांना प्रक्रिया केलेले सांडपाणी नदीत सोडण्यास परवानगी दिलेली नाही. या नदीच्या पाण्याची गुणवत्ता ही नेमून दिलेल्या मानांकनापेक्षा विहित मर्यादेत आहे. केंद्रीय तसेच राज्य पाणी गुणवत्ता निरीक्षण कार्यक्रमांतर्गत पाण्याचे नमुने घेऊन त्यांच्या पृथक्करण अहवालवरून नदीच्या पाण्याची गुणवत्ता ही सरासरी मर्यादेत असल्याचे मंडळाचे म्हणणे आहे.

Related posts: