|Monday, December 17, 2018
You are here: Home » उद्योग » ‘रिलायन्स’ बाजारातून 40 हजार कोटी उभारणार

‘रिलायन्स’ बाजारातून 40 हजार कोटी उभारणार 

वृत्तसंस्था/ मुंबई

ग्राहकसेवा व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी रिलायन्स इन्डस्ट्रीजतर्फे बाजारातून 40 हजार कोटी रुपये उभारण्यात येणार आहेत. चालू आर्थिक वर्षात ही रक्कम गोळा करण्यात येईल. मुकेश अंबानी यांची ही कंपनी कर्ज, रोख्याच्या माध्यमातून निधी गोळा करणार आहे.

पाच वर्षांत रिलायन्स इन्डस्ट्रीजच्या कर्जात तिप्पट वाढ नोंदविण्यात आली. दूरसंचार आणि पेट्रोकेमिकल्स व्यवसायासाठी 3.3 लाख कोटी रुपये खर्च करण्यात आले. चालू वर्षात ब्रॉडबॅन्ड सेवा चालू करण्यासाठी आणि अनिल अंबानी यांच्याकडील रिलायन्स कम्युनिकेशन्सचा व्यवसाय खरेदी करण्यासाठी मोठय़ा निधीची आवश्यकता आहे.  रिलायन्सच्या डोक्यावर एकूण 2.2 लाख कोटी रुपयांचे कर्ज असून 2022 पर्यंत निम्मे फेडण्याचा प्रयत्न आहे. कंपनीकडील सध्याच्या दीर्घकालीन कर्जात बदल आणि अल्पकालीन कर्जाची मुदत वाढविण्यासाठी निधीची गरज भासणार आहे.

Related posts: