|Saturday, March 23, 2019
You are here: Home » उद्योग » 11 कोटी घरांत पोहोचविणार आयुष्मान कार्ड

11 कोटी घरांत पोहोचविणार आयुष्मान कार्ड 

वृत्तसंस्था/नवी दिल्ली

मोदी सरकारची महत्त्वाकांक्षी असणारी आयुष्मान भारत योजनेनुसार सरकार आता 11 कोटी फॅमिली कार्डची छपाई करणार आहे. लाभार्थ्यांना हे कार्ड त्यांच्या हाती सोपविण्यात येणार आहे, ज्यामुळे योग्य लाभार्थ्याला हे कार्ड मिळेल. गावातील लोकांसाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे.

या कार्डवर योजनेचा लाभार्थ्यांची नावे असणार आहेत आणि त्यासोबत एक पत्र देण्यात येईल, ज्यामध्ये योजनेतील सर्व माहिती उपलब्ध असेल. फॅमिली कार्डमधील लाभार्थ्यांची ओळख पटविण्याची प्रक्रिया सहजसोपी करण्यात येणार आहे. मात्र त्यासाठी अन्य कागदपत्रांची आवश्यकता भासेल.

राष्ट्रीय आरोग्य संस्थेकडून सूचना मिळताच लाभार्थ्यांसाठी सेवा पुरवठय़ाचे पत्र मिळताच छपाई करण्यास सुरूवात होईल. डेटा सुरक्षेच्या नियमांचे पालन करत लाभार्थ्यांच्या जिल्हा मुख्यालयात हे कार्ड पाठविण्यात येईल. यानंतर ग्रामपंचायत आणि आरोग्य कर्मचाऱयांकडून गावस्तरावर त्याचे वाटप करण्यात येईल.

2019 च्या अर्थसंकल्पात मोदी सरकारने आयुष्मान भारत योजनेची घोषणा केली होती. या योजनेनुसार देशात 10 कोटी कुटुंबाना 5 लाखापर्यंत मोफत आरोग्य विमा संरक्षण देण्यात येईल. यामध्ये सर्व गंभीर आजारांवरील सेवांचा समावेश करण्यात आला आहे.

 

Related posts: