|Sunday, February 17, 2019
You are here: Home » क्रिडा » पी.व्ही. सिंधूला पुन्हा ओकुहाराचा अडथळा येणार

पी.व्ही. सिंधूला पुन्हा ओकुहाराचा अडथळा येणार 

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

चीनमध्ये 30 जुलै ते 5 ऑगस्ट दरम्यान होणाऱया विश्व बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या पी.व्ही. सिंधुला पुन्हा जपानच्या नोझोमी ओकुहाराच्या आव्हानाला तोंड द्यावे लागेल. गेल्या दोन स्पर्धामध्ये सिंधु आणि ओकुहारा यांच्यात अंतिम लढत झाली होती.

गेल्यावर्षी ग्लॅस्गो येथे सिंधु आणि ओकुहारा यांच्यातील झालेल्या चुरशीच्या लढतीच्या आठवणी आजही ताज्या आहेत. गेल्यावर्षीच्या बॅडमिंटन हंगामामध्ये ओकुहाराला दुखापतीने चांगलेच दमविले होते. गेल्या आठवडय़ात झालेल्या थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत ओकुहाराने अंतिम सामन्यात सिंधुला पराभूत केले होते. या पराभवाची परतफेड करण्याची संधी सिंधुला या स्पर्धेत मिळाली आहे. विश्व बॅडमिंटन स्पर्धेचा काढण्यात आलेल्या ड्रॉ मध्ये सिंधुची तिसऱया फेरीत गाठ कोरियाच्या हेयुनशी पडण्याची शक्यता आहे. या स्पर्धेत सिंधुला पहिल्या फेरीत पुढे चाल देण्यात आली आहे.

दोनवेळा राष्ट्रकुल स्पर्धेचे विजेतेपद मिळविणाऱया भारताच्या सायना नेहवालला थायलंडच्या इंथेनॉन आणि ऑलिंपिक विजेत्या मॅरीनशी लढत द्यावी लागेल. 2015 च्या विश्व बॅडमिंटन स्पर्धेत सायनाने रौप्यपदक मिळविले होते. पुरूष एकेरीत के. श्रीकांतचा सलामीचा सामना आयर्लंडच्या नेग्युयेनशी होईल. गेल्या वर्षीच्या बॅडमिंटन हंगामात के. श्रीकांतने चार स्पर्धा जिंकल्या आहेत. या स्पर्धेत भारताच्या एच.एस. प्रणॉयच्या कामगिरीकडे लक्ष लागले आहे.

Related posts: