|Thursday, July 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » सुरेंद्र गावडे यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करणाऱयावर कडक कारवाई &करा

सुरेंद्र गावडे यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करणाऱयावर कडक कारवाई &करा 

प्रतिनिधी/ पणजी

 सोनशी येथील युवक सुरेंद्र गावडे यांच्यावर पुन्हा मंगळवारी पहाटे खाण माफियांकडून हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. याचा ‘गाकुवेध’ संघटना तीव्र निषेध करत असून या प्रकरणाची सीबीआय मार्फत चौकशी करुन आरोपींवर कडक कारवाई करण्याची मागणी या संघटनेतर्फे करण्यात आली.

 सुरेंद वेळीप आपली रात्रपाळी करुन पहाटे 5 वा. घरी जात होते अचानक काळे प कपडे व बुरखा घातलेले दोघे जण त्यांच्या गाडी समोर आले. त्याच्या मोटारसायकलची चावी काडून घेतली यावेळी सुरेंद्र यांनी मोबाईल बाहेर काढताना त्यांनी त्याला सुरीचा धाक दाखवून हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पण सुरेंद यांनी जीवाच्या अकांताने गावाकडे धाव घेतल्याने त्याचा जीव वाचला. या अगोदरही त्याच्यावर अनेक हल्ले करण्याचे प्रयत्न झाले आहे. सोनशीतील बेकायदेशिर खाणी विरोधात त्यांनी आवाज उठवला होता. तसेच याविरोधात त्यांनी तक्रारी दाखल केल्या होत्या. यामुळे खाण माफियांकडून त्यांना फोनवर धमक्या येत होत्या. याची तक्रार वाळपई पोलिस स्थानकात करण्यात आली आहे. तसेच पोलिस महासंचालकांना निवेदन दिले आहे, असे यावेळी या संघटनेचे अध्यक्ष रुपेश वेळीप यांनी सांगितले.

 सोनशी गावाचे जे कार्यकर्ते खाण माफियाविरोधात आवाज उठवत आहे त्यांच्यावर असे हल्ले होतात. सुरेंद्र वेळीप यांनी बेकायदेशिर खाणी विरोधात आवाज उठविला होता यामुळे त्यांच्यावर असे हल्ले करण्यात आले. पण आता गाकुवेध संघटना गप्प बसणार नसून या विरोधात आवाज उठवणार आहे. आरोपींना पकडून कडक कारवाई ंकरण्याची मागणी आम्ही केली आहे, असे यावेळी रविंद वेळीप यांनी सांगितले.

 जे गोव्याच्या रक्षणासाठी आवाज करत आहे अशा कार्यकर्त्यांवर हल्ले होत आहे. पोलिसही हे प्रकरण गांभिर्याने घेत नाही. आज अनेक जणांवर असे हल्ले होत आहे. पण आता आम्ही गप्प बसणार नाही. ही संघटना या विरोधात आवाज उठवणार आह,s असे यावेळी रामा काणकोणकर यांनी सांगितले.