|Monday, November 19, 2018
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » म्हाकवे-हदनाळ रस्त्याला ओढय़ाचे स्वरुप

म्हाकवे-हदनाळ रस्त्याला ओढय़ाचे स्वरुप 

वार्ताहर /म्हाकवे :

गेली 14 वर्षे महाराष्ट्र शासनाने दुर्लक्ष केलेने म्हाकवे-हदनाळ रस्त्याची दुरवस्था आहे. सध्या पावसाने संपण्tा& दोन कि. मी. रस्त्यावर मोठमोठय़ा खडय़ात पाणी साचून रस्त्याला ओढय़ाचे स्वरुप आले आहे. प्रवाशांना या रस्त्यावरुन जीव मूठीत घेवून प्रवास करावा लागत आहे.

म्हाकवे-हदनाळ दरम्यानचा रस्ता तीन कि. मी.चा आहे. यातील दोन किमी महाराष्ट्र हद्दीतील रस्ता आमदार हसन मुश्रीफ यांच्या फंडातून चौदा वर्षापूर्वी केला आहे. यानंतर या रस्त्याचे दुरुस्तीचे कामही झाले नाही. या मार्गावरुन निपाणी व कागल आगाराच्या बस फेऱया सुरु आहेत. विद्यार्थी रस्त्याचा वापर करतात. म्हाकवेच्या लोकांना याचा फारसा उपयोग होत नसला तरीही माळी वसाहत,  देवडकर वसाहत, चौगुले मळा याच मार्गावर आहेत. येथे 50 कुटूंबे राहतात. यांना त्रास होत आहे.

रस्त्यावरील खड्डे 2017 च्या पावसाळ्यात हदनाळ ग्रामस्थ, विद्यार्थी व एमआयडीसी कामगार  यांनी वर्गणी जमा करुन बुजवले होते. सध्या मात्र संपूर्ण दोन कि. मी. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने बस बंद होण्याची वेळ आली आहे. यामुळे कॉलेजच्या विद्यार्थ्यांना व रुग्णांना तीन कि. मी. पायपीट करावी लागणार आहे. या रस्त्यावरील मुरुम टाकून खड्डे तात्पुरते मुजवावेत, अशी मागणी होत आहे.

यासाठी आमदार हसन मुश्रीफ,  खासदार धनंजय महाडिक यांना निवेदन देवून पाठपुरावा केला आहे. पण सदरचा रस्ता जिल्हा परिषदेच्या देखरेखीखाली येत असल्यामुळे निधी उपलब्ध होण्यास अडचण येत आहे.  हदनाळ व म्हाकवे ग्रामस्थांची अडचण लक्षात घेवून ग्रामपंचायतीच्या माध्यमातून या मार्गावर खड्डे निधी  उपलब्ध होतातच मुजवले जातील असे आश्वासन सरपंच भारत लोहार, उपसरपंच रमेश पाटील, ग्रा. पं. सदस्य जीवन कांबळे यांच्यासह सर्व सदस्यांनी दिले आहे.

 

Related posts: