|Friday, March 22, 2019
You are here: Home » उद्योग » अविश्वासाच्या मतदानापूर्वी बाजारात दबाव

अविश्वासाच्या मतदानापूर्वी बाजारात दबाव 

वृत्तसंस्था /मुंबई :

केंद्रातील संपुआ सरकारविरोधात अविश्वास प्रस्तावावर आज, शुक्रवारी मतदान होणार असल्याने गुंतवणूकदारांमध्ये दबाव दिसून आला. सलग दुसऱया सत्रात बाजार घसरत बंद झाला. याचप्रमाणे डॉलरच्या तुलनेत रुपयाने पुन्हा 69 चा टप्पा गाठल्याने विक्री वाढल्याचे दिसून आले.

बीएसईचा सेन्सेक्स 22 अंकाने घसरत 36,351 वर बंद झाला. एनएसईचा निफ्टी 23 अंकाने कोसळत 10,957 वर स्थिरावला.

स्मॉलकॅप आणि मिडकॅप समभागांमध्ये विक्रीचा दबाव कायम होता. प्रारंभीच्या सत्रात बाजारात तेजी आल्याने सेन्सेक्सने 36,515 चा टप्पा गाठला होता. मात्र दुपारनंतर तो 36,279 पर्यंत घसरला होता. एनएसईचा निफ्टी निफ्टी 11,006 आणि 10,935 पर्यंतच्या पातळीमध्ये होता.

रुपया कमजोर झाल्याने बाजारात जास्त वेळ नकारात्मकता दिसून आली. डॉलरच्या तुलनेत रुपया कमजोर होत आहे आणि आंतरराष्ट्रीय संकेत भारतीय बाजाराच्या दिशेने दिसत नाहीत. अमेरिका आणि अन्य प्रमुख अर्थव्यवस्थांमधील व्यापारावर अजूनही गुंतवणूकदारांचे लक्ष आहे. सरकारकडून भांडवल देण्यात येणार असल्याने सरकारी बँकांत तेजी आली होती, असे गिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे प्रमुख विनोद नायर यांनी सांगितले.

नफ्यामध्ये 13 टक्क्यांनी घसरण जाहीर करण्यात आल्याने माईंडट्री हा आयटी क्षेत्रातील समभाग 8.67 टक्क्यांनी कोसळला. सेन्सेक्समध्ये कोटक बँक 3.69 टक्के, एल ऍण्ड टी 2.61 टक्के, हीरो मोटो 1.22 टक्के, टाटा स्टील 0.98 टक्क्यांनी घसरले. मंत्रिमंडळाच्या निर्णयाने ओएनजीसीचा समभाग 0.69 टक्क्यांनी वधारला. 

निर्देशांकाची कामगिरी पाहता बीएसईचा भांडवल निर्देशांक 1.80 टक्के, आरोग्यसेवा 1.25 टक्के, आयटी 0.79 टक्के, बँक 0.38 टक्क्यांनी घसरले. ग्राहकोपयोगी वस्तू, ऊर्जा, एफएमसीजी, तेल आणि वायू निर्देशांक 0.99 टक्क्यांपर्यंत वधारले.

बीएसईचा मिडकॅप 0.63 टक्के आणि स्मॉलकॅप निर्देशांक 1 टक्क्याने घसरला.

आशियाई आणि युरोपियन बाजारात घसरण दिसून आली.

 

Related posts: