|Saturday, March 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » शिरढोणला चक्काजाम, दूध ओतले

शिरढोणला चक्काजाम, दूध ओतले 

प्रतिनिधी /कवठेमहांकाळ :

दूध दरावरून सुरू असलेल्या आंदोलनाचा फटका दुष्काळी तालुक्यातील शेतकऱयांना बसला असला तरी केवळ भविष्यातील लाभासाठी पशुपालकांनी हा तोटा सहन केला आहे. शेतकऱयांना न्याय मिळण्यासाठी गुरूवारी चक्काजाम आंदोलन करण्यात आले असल्याचे शेतकरी संघटनेच्या जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी सांगितले. तसेच सरकार शेतकऱयांना फसवत आहे. चांगल्या दरवाढीपर्यंत आंदोलन सुरूच राहील सरकारने बळाचा वापर केल्यास शेतकऱयांचा उद्रेक होईल असेही खराडे म्हणाले.

मिरज-पंढरपूर मार्गावर शिरढोण (ता. कवठेमहांकाळ) येथे दूध दरवाढीच्या मागणीसाठी चक्का जाम आंदोलन करण्यात आले येथे दूध दरवाढीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. स्वाभिमानी शेतकरी संघटना, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, किसान सभा यांच्यावतीने अनेक शेतकयांच्या उपस्थितीत आंदोलन झाले. यावेळी सरकारबद्दल जोरदार घोषणाबाजी करून आपला रोष व्यक्त केला.

रस्त्यावर दूध ओतून आणि गाईला दुधाचा अभिषेक घालून शासनाचा निषेध करण्यात आले. तासभर चाललेल्या आंदोलनामुळे महामार्गावर दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. 

याप्रसंगी स्वाभिमानाचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे, शिवसेनेचे  तालुकाध्यक्ष दिनकर पाटील, मारुती पवार, संजय चव्हाण, राष्ट्रवादीचे गणेश पाटील, दिग्विजय शिंदे, अभिजित पाटील, किसान सभेचे कॉ. दिगंबर कांबळे, गवस शिरोळकर, स्वाभिमानाचे सूरज पाटील, शिवाजी पाटील, शंकर लंगोटे, बोरगावचे सरपंच सहदेव परीट, उपसरपंच नामदेव पाटील, अमोल पाटील, संदीप पाटील, विशाल रसाळ यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. अप्पर तहसीलदार नागेश गायकवाड

Related posts: