|Tuesday, June 18, 2019
You are here: Home » उद्योग » अविश्वासाच्या मतदानापूर्वी बाजारात दबाव

अविश्वासाच्या मतदानापूर्वी बाजारात दबाव 

सलग दुसऱया सत्रात घसरण : डॉलरच्या तुलनेत रुपयाही कमजोर

वृत्तसंस्था/ बेंगळूर

देशातील सॉफ्टवेअर क्षेत्रातील निर्यातीच्या बाबतीत तिसऱया क्रमांकाची कंपनी विप्रोने जून तिमाहीचा निकाल जाहीर केला. कंपनीच्या नफ्यात अपेक्षेपेक्षा अधिक वाढ दिसून आली. 30 जून रोजी संपलेल्या तिमाहीत कंपनीचा नक्त नफा 2,121 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. गेल्या वर्षी समान कालावधीत तो 2,077 कोटी रुपये होता. कंपनीच्या उत्पन्नात 5 टक्क्यांनी वाढ होत 13,700 कोटी रुपयांवर पोहोचले आहे, तर बीएफएसआय व्यवसाय 17.5 टक्क्यांनी वाढत 4,110 कोटी रुपयांवर पोहोचले.

30 सप्टेंबर रोजी संपणाऱया दुसऱया तिमाहीत उत्पन्न 0.3 ते 2.3 टक्क्यांनी वाढेल अशी आशा कंपनीने व्यक्त केली आहे. हा आकडा 2.01 अब्ज डॉलर्स ते 2.05 अब्ज डॉलर्संपर्यंत पोहोचले असे व्यक्त करण्यात आले आहे. डेटा सेन्टर व्यवसायामध्ये गुंतवणूक वाढविण्यात असून त्याचा लाभ कंपनीला दिसून येईल.

विप्रोने अमेरिकेतील अलीएट सोल्युशन्सचा भारतातील व्यवसाय खरेदी करण्यात येईल असे सांगितले. कंपनीची मुंबई, गुरुग्राम, चेन्नई आणि नोएडामध्ये केंद्रे आहेत.