|Thursday, July 18, 2019
You are here: Home » भविष्य » राशिभविष्य

राशिभविष्य 

मेष

आठवडय़ाच्या सुरुवातीला मनाप्रमाणे कामे होणार नाहे. वाद, कटकटी वाढतील.  शांतपणे प्रकरणे हाताळण्याचा प्रयत्न करा. नोकरीमध्ये अचानकपणे बदली होण्याचा योग आहे. योग्य ठिकाण मिळाल्याने आनंदात भर पडेल. वरि÷ आपल्या कामावर खूष राहतील. जीवनसाथीच्या तब्येतीची काळजी घ्या. किरकोळ त्रास संभवतो. कला क्रीडा क्षेत्रात चांगली प्रगती होणार आहे. एखादी विक्रमी खेळी खेळू शकाल. प्रेमप्रकरणात यश मिळेल. एखादे गुपित असल्यास ते आताच घरातील व्यक्तींना सांगून टाका. पुढे गैरसमज वाढतील.


वृषभ

ग्रहमानाची फारशी  साथ नसली तरी यंदाचा आठवडा चांगला जाणार आहे. शैक्षणिकदृष्टय़ा उत्तम काळ आहे. स्पर्धा परीक्षा व इतर क्षेत्रात चांगलेच यश मिळणार आहे. वडिलोपार्जित संपत्तीसंबंधी कायदेशीर प्रश्न उद्भवण्याची शक्मयता आहे. कौंटुंबिक एकोपा विस्कळीत  होणार नाही, याची काळजी घ्या. व्यवहारात सावध रहा. नाटय़चित्रपट क्षेत्रात नवीन संधी मिळेल. शेतकरी वर्गाने हवामानाचा अंदाज घेऊन मगच पेरणी करावी. पाण्याचा साठा करून ठेवा. पाऊस जोरदार पडणार आहे.


मिथुन

शिक्षणानिमित्त परदेशी जाण्याचे योग जुळून येतील. आठवडय़ाच्या सुरुवातीला कामाचा व्याप वाढण्याची शक्मयता आहे. प्रिय व्यक्तींशी वाद घालू नका. अनाठायी खर्च झाल्याने आर्थिक चणचण भासेल. नोकरीत मात्र काळ चांगला आहे. धीम्या गतीने धंद्यात प्रगती संभवते. राजकीय, सामाजिक क्षेत्रात वरि÷ आपल्यावर मोठी जबाबदारी टाकण्याची शक्मयता आहे. उतावळेपणा कमी करण्याची गरज आहे. आरोग्याची काळजी घ्या. पुढे येणारा काळ थोडा प्रकृतीकरिता कठीण आहे. आतापासून काळजी घेतल्यास किडनी संबंधीत त्रास होणार नाही.


कर्क

लोकांच्या भेटीगाठी संभवतात. दु:खी वातावरण जरी असले तरी नवीन ओळखीतून नवे मार्ग सापडतील. प्रकृतीची काळजी घेणे आवश्यक आहे. बुधवार, गुरुवार मानसिक, शारीरिक त्रास संभवतो. मुलांची जबाबदारी स्वीकारावी लागेल. त्यांच्याकरिता वेळात वेळ काढावा लागेल. मनाविरुद्ध घटना घडल्याने एक प्रकारचा तणाव जाणवणार आहे. शेतीच्या कामात यश मिळेल. आता पिकवलेल्या पिकाला पुढे चांगला मोबदला मिळणार आहे. पाऊस जास्त पडण्याची शक्मयता आहे. त्यानुसार कामाचे नियोजन करा.


सिंह

मित्र परिवाराकडून आर्थिक मदत घेण्याची शक्मयता आहे. नवीन व्यवसायात गती मिळेल. कमी श्रमात मोठे अर्थ लाभ होतील. नोकरीत सतत बदलीचा योग असून थोडीशी  धावपळ उडेल, पण नुकसान होणार नाही. शेतीच्या कामात प्रगती संभवते. राजकीय, सामाजिक क्षेत्रात आपल्या निर्णयाला जर मान मिळाला नाही किंवा वरि÷ांनी कौतुक केले नाही तरी तो लोकहिताकरिता चांगलाच ठरणार असणार आहे. वाहन खरेदी करण्याचा योग जुळून येईल.


कन्या

राजकीय, सामाजिक क्षेत्रात आपण केलेल्या बदलाचा फायदा आपणास आता मिळण्यास सुरुवात होणार आहे.  लोकांना आपल्या कामाचे महत्त्व आता जाणवू लागेल. अनपेक्षितरित्या विशिष्ट कामासाठी परदेशगमनाचे  योग जुळून येतील. व्यवसायात आर्थिक आवक वाढेल. मित्रवर्गाचे सहकार्य लाभणार असून करमणूक प्रधान कार्यक्रमात भाग घ्याल. कलाक्रीडा क्षेत्रात विजयश्री खेचून आणू शकाल. विद्यार्थी वर्गाकरिता उत्तम काळ आहे. अभ्यासात थोडी  मेहनत घेतली तर चांगले यश पदरात पडणार आहे.


तुळ

घरातील जुन्या आठवणींना उजाळा मिळेल. कला, क्रीडा क्षेत्रात उत्तम कामगिरी बजावाल. आध्यात्मिक क्षेत्रात प्रगती संभवते. मानसिक ताण कमी होईल. अचानक धनलाभ झाल्याने मोठी खरेदी कराल. ओळखी व मध्यस्थी यांच्यामार्फत मोठी कामे मार्गी लागतील. सामाजिक क्षेत्रात आपल्या कामाची दखल घेऊन एखादा मानसन्मान मिळेल. शेतीच्या कामात गती मिळेल. वाहन खरेदी करण्याची इच्छा मनात येईल. शिक्षणाकरिता परदेशी जाण्याची संधी मिळण्याची शक्मयता आहे.


वृश्चिक

साडेसाती चालू आहे. त्यामुळे किरकोळ अडचणी राहणार आहे. या आठवडय़ात महत्त्वाची कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. नोकरीत मानाचे स्थान मिळण्याची शक्मयता आहे. व्यवसायात, भागीदारीत वाद गैरसमज संभवतात. आर्थिक व्यवहारात फसगत घेण्याची शक्मयता असून वडिलोपार्जित प्रॉपर्टी पासून थोडय़ा कटकटी निर्माण होतील. राजकीय, सामाजिक क्षेत्रात ठाम मत मांडू नका. शत्रुपक्ष आपल्या चुकांचा फायदा घेण्याची शक्मयता आहे. आरोग्याची चांगली काळजी घ्या.


धनु

 या सप्ताहात तुम्हाला तडजोड करण्याची वेळ सर्वच ठिकाणी येऊ शकते. रविवार, सोमवार महत्त्वाच्या वस्तू सांभाळा. वाद व तणाव वाढू शकतो. डोळय़ांची काळजी घ्या. राजकीय, सामाजिक कार्यात तुमच्या कार्यातील चुकांचा पाढा वाचला जाईल. वरि÷ तुमची बाजू घेण्याचे टाळतील. धंद्यात खर्च व समस्या येईल. कामगार तक्रारी करतील. डोके शांत ठेवावे लागेल. नोकरीत कामाकडे लक्ष द्या. प्रवासात घाई नको. कोर्टकेसमध्ये अडचणी येतील.


मकर

धंद्यात लक्ष द्या. नवीन कंत्राट मिळवण्याचा प्रयत्न करा. नोकरीत वर्चस्व वाढेल. बुधवार, गुरुवात घरात गैरसमज होईल. खर्च वाढेल. राजकीय, सामाजिक कार्यात योजनांना गती मिळेल. तुमचे भाषणप्रभुत्व चमत्कारजन्य बदल घडवू शकते. कुणालाही दुखवू नका. विरुद्धलिंगी व्यक्तीकडून फसगत होऊ शकते. कला, क्रीडा क्षेत्रात प्रगतीची संधी मिळेल. शिक्षणात यश मिळेल.


कुंभ

सप्ताहाच्या सुरुवातीला महत्त्वाची कामे करण्याची जिद्द ठेवा. अहंकार ठेवू नका. डोळय़ांची काळजी घ्या. प्रवासात कायद्याचे पालन करा. गुरुपौर्णिमेच्या दिवशी अपमानास्पद घटना संभवते. जास्त गर्दीत जाऊ नका. राजकीय, सामाजिक कार्यात नमते धोरण तात्पुरते घ्यावे लागेल. धंद्यात वाद होईल. कामगारांचा त्रास जाणवेल. घरातील वृद्ध व्यक्तींची काळजी वाटेल. कला, क्रीडा क्षेत्रात कष्ट पडतील.


मीन

कोणतीही महत्त्वाची कामे करून घ्या. धंद्यात वाढ होईल. भागिदाराबरोबर किरकोळ वाद संभवतो. संसारातील क्यक्तीसाठी खर्च करावा लागेल. प्रेमात वाद संभवतो. राजकीय, सामाजिक कार्यात कामाचा विस्तार करण्याची संधी मिळेल. अधिकार प्राप्ती होऊ शकेल. शिक्षणात प्रगती होईल. कला, क्रीडा क्षेत्रात प्रसिद्धी मिळेल. लिखाणाला चांगला विषय मिळेल. गुरुपौर्णिमाला विशेष घटना घडू शकते.