|Saturday, March 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » दुर्मीळ छायाचित्रांतून उलगडणार साने गुरूजींचा जीवनपट!

दुर्मीळ छायाचित्रांतून उलगडणार साने गुरूजींचा जीवनपट! 

पालगड मूळ निवासस्थानी राष्ट्रीय स्मारक समितीचा उपक्रम

समीर पिंपळकर /पालगड

दापोली तालुक्यातील पालगड येथील साने गुरुजींचे मुळ निवासस्थान राष्ट्रीय स्मारक स्मृतिभवन म्हणून जतन करण्यात आले आहे. या स्मृतिभवनात गुरूजींचा जीवनपट उलगडून दाखवणारी माहिती व दुर्मीळ छायाचित्रांचा खजिना पाहण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे.

स्मृतिभवन म्हणून जतन केलेले गुरुजींचे घर पालगड येथे 1937च्या सुमारास बांधण्यात आले होते. त्यावेळी साने गुरुजी अंमळनेर येथे होते. प्राचार्य गोखले यांनी त्यावेळी गुरुजींना 500 रुपये घर बांधण्यासाठी दिले होते. हे पैसे गुरुजींनी घर बांधण्यासाठी पालगडचे खोत व गुरुजींचे मित्र विठ्ठलराव बेलोसे यांच्याकडे दिले होते. तसेच घर बांधण्याची जबाबदारी विठ्ठलराव बेलोसे यांच्याकडे सोपवली होती. त्यांनी गुरुजींचे घर बांधून घेतले. त्यावेळचे लाकडी भाले आजही पहायला मिळतात. या घरात गुरुजींचे वास्तव्य क्वचितच राहिले.

पालगडमध्ये आल्यावर गुरुजी आपले स्नेही रावजी केळकर यांच्याकडे उतरत असत. गुरुजींचे एक बंधू गजानन यांचे कुटुंब येथून दुसरीकडे स्थायिक झाले. तेव्हापासून हे घर बंद होते. गुरुजींच्या जन्मशताब्दीनिमित्त 1999मध्ये या घराचे स्मृतिस्मारक म्हणून लोकार्पण करण्यात आले. पालगड येथील स्मारक उभारताना शासनाने या जागा इमारतीसह माणगाव वडघर येथील स्मारक ट्रस्टच्यावतीने मूळ घरामध्ये कोणतेही बदल न करता तिचे मजबुतीकरण केले.

त्यानंतर राज्य शासनाने नेमलेल्या समितीने गुरूजींच्या संपूर्ण जीवनावर एकत्रित प्रकाश टाकणारा भित्तीचित्रांचा प्रकल्प तयार केला. हा उपक्रम पाहता ही भित्तीचित्रे प्रकल्प तयार करण्यासाठी घेतलेली मेहनत लक्षणीय आहे. हा समग्र छायांकित जीवनपट सध्या या स्मारकामध्ये संग्रहित करण्यात आल्याची माहिती येथील साने गुरुजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरद केळकर यांनी ‘तरुण भारत’शी बोलताना दिली.

Related posts: