|Wednesday, December 19, 2018
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » उपवनसंरक्षक चव्हाण यांच्याकडून हेवाळेत पाहणी

उपवनसंरक्षक चव्हाण यांच्याकडून हेवाळेत पाहणी 

प्रतिनिधी / दोडामार्ग:

हेवाळे येथील हत्ती प्रतिबंधात्मक उपाययोजनेसंदर्भात जिह्याचे उपवनसंरक्षक समाधान चव्हाण यांनी बांबर्डे परिसराची प्रत्यक्ष पाहणी केली. नियोजित काँक्रीट भिंत, वनहद्दीवर सौर कुंपण व अन्य आवश्यक उपाययोजनांचा त्यांनी आढावा घेतला.

यावेळी सरपंच संदीप देसाई, ग्रामपंचायत सदस्य दौलत राणे, वनक्षेत्रपाल ए. पी. गमरे, वनपाल दत्ताराम देसाई, वनरक्षक मुकाटे, मदन राणे, प्रवीण देसाई, सूरज राणे, संदेश राणे, वृषभ राणे आदी उपस्थित होते. तालुक्यातील हेवाळे गावातील हद्दीत रानटी हत्तींचा धुमाकूळ सुरू असून शेतीचे अतोनात नुकसान करण्यात आले आहे. हत्तींचा बंदोबस्त व्हावा तसेच उपाययोजनांची ग्रामस्थांची मागणी होती. त्या पार्श्वभूमीवर चव्हाण यांनी भेट दिली.

Related posts: