|Tuesday, July 16, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » ‘मराठय़ां’चा संताप अनावर

‘मराठय़ां’चा संताप अनावर 

सोलापूर जिह्यात हिंसक आंदोलने

 

प्रतिनिधी/ सोलापूर

मुख्य मराठा आरक्षणासह प्रलंबीत मागण्यांसाठी सकल मराठा समाज आक्रमक होत असल्याचे चित्र आहे. याचा प्रत्यय शनिवारी सोलापूर शहर आणि जिह्याच्या ग्रामीण भागात आला. ठिक-ठिकाणी आंदोलनाला उग्र स्वरुप आलेले दिसले. उत्तर सोलापूर, बार्शी, मोहोळ, पंढरपूर आदी तालुक्यात एस टी बसेस जाळण्याबरोबरच तोडफ्ढाsड करण्याचे प्रकार झाले. दुपारनंतर सोलापूर तसेच बार्शी आगारातून बस गाडय़ांची आवक-जावक बंद करण्यात आली. सोलापुरात शिवाजी चौकात चक्काजाम करण्याबरोबरच पुणे नाका येथील स्मशानभूमीत मुंडन आंदोलन केले. मागील वर्षाभरापासून आरक्षणाचं गाजर दाखवणाऱया सरकार बद्दलच्या संतप्त भावना या आंदोलनातून उमटल्याचे दिसून आले.

गत वर्षात राज्यभर मराठा आरक्षणासाठी सकल मराठा समाजाने तब्बल 58 मुक मोर्चे काढले. शांततेने काढलेल्या या मोर्चामध्ये लाखोंच्या संख्येने मराठा बांधव सहभागी झाले. या समाजाने प्रत्येकवेळी संयम दाखवला. तथापी आरक्षणा संदर्भात राज्य सरकार सकारात्मक होत नाही हे गृहीत धरुन या समाजाने आता दुसरा टप्पा म्हणून आंदोलन सुरु केले आहे. परंतु दुसऱया टप्प्यातील आंदोलन हे शांततेच्या मार्गाने चालले आहे असे नसल्याचे शनिवार पासूनच्या आंदोलनातून दिसू लागले आहे. आजच्या दिवशी आंदोलनाला जे स्वरुप आलेले दिसले त्यावरुन या समाजाकडून ठोक मोर्चे सुरु झाल्याचा प्रत्यय दिसला.

तुळजापूर येथे ठोक मोर्चा काढत मराठा समाजाच्या दुसऱया टप्प्यातील आंदोलनाला सुरुवात झाली आहे. याचाच एक भाग म्हणून शनिवारी सकाळी 11 वाजता सोलापूर शहरातील शिवाजी चौक येथे चक्काजाम आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे शहरात वाहतुकीची चांगलीच कोंडी झाली. यावेळी काही आंदोलकांनी मुख्यमंत्र्यांची पोस्टर पायाखाली तुडवत निषेध करण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी आंदोलकांना अडवत मुख्यमंत्र्यांची पोस्टर काढून घेतली.

याचवेळी पुना नाका येथील स्मशानभूमीत सकल मराठा समाजाने मुंडण आंदोलन करत सरकारचा निषेध केला. यावेळी योगेश पवार, राम जाधव, किरण पवार, नागेश सावंत, कृष्णा थोरात, दत्ता भोसले, विष्णू माने आणि विष्णू भोसले यांनी आपले मुंडण करवून घेतले.

या दोन्ही आंदोलनात दिलीप कोल्हे, प्रताप चव्हाण, माऊली पवार, महेश धाराशिवकर, इंद्रजित पवार, दास शेळके, किरण पवार, योगेश पवार, बाळासाहेब गायकवाड, लता ढेरे, नागनाथ जाधव, उषा राऊत, पल्लवी चवरे यांच्यासह मोठय़ा संख्येने मराठा समाज बांधव सहभागी झाले होते.

  जिह्यात उत्तर सोलापूर, बार्शी, मोहोळ, पंढरपूर आदी तालुक्यात आंदोलनाला हिंसक वळण लागले. वडाळा येथील लोकमंगल महाविद्यालयाजवळ आंदोलकांनी एस टी बस पेटवून दिली, तर गावडी दारफ्ढळ येथे बसवर दगडफ्sढक करण्यात आली. मोहोळ तालुक्यात पोखरापूर येथे आंदोलकांनी बसवर दगडफ्sढक करत बस फ्ढाsडली. असाच प्रकार पंढरपूर तालुक्यातील सोनके येथेही झाला. एकूण आजच्या आंदोलना दरम्यान 7 एसटी बसेसचे नुकसान झाल्याची अधिकृत माहिती राज्य परिवहन महामंडळाच्या सुत्रांकडून देण्यात आली. गावडी दारफ्ढळ येथील हिंसक घटनेची माहिती मिळताच तात्काळ पोलिसांचा फ्ढाwजफ्ढाटा घटनास्थळावर दाखल झाला. पोलिसांनी मराठा क्रांती मोर्चातील आंदोलकांना ताब्यात घेतल्याचे वृत्त आहे.