|Thursday, July 18, 2019
You are here: Home » Top News » मराठा आंदोलन आक्रमक, बसेसची तोडफोड

मराठा आंदोलन आक्रमक, बसेसची तोडफोड 

ऑनलाईन टीम / सोलापूर :

मराठासमाजाला आरक्षण मिळावेयासाठी मराठा आंदोलक आक्रमक झाल्याचे चित्र दिसत आहे. सोलापूर जिह्यातील मंगळवेढा आणि बार्शी तालुक्मयात मराठा समाजातील आंदोलकांनी एसटी बसेसची तोडफोड केली आहे.

आंदोलकांनी पंढरपुरात सहकारमंत्री सुभाष देशमुख आणि जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांना घेराव घातला आहे. राज्य सरकारच्या धोरणांचा निषेध नोंदवत मुख्यमंत्र्यांना पांडुरंगाची पूजा न करू देण्याचा इशारा देण्यात आला आहे. राज्यातील सकल मराठा समाजाने गेल्या 4 दिवसांपासून विविध तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. मागील 3 दिवसांपासून शांततेत सुरू असलेल्या या आंदोलनाला आज गालबोट लागल्याचे चित्र दिसत आहे. मराठा आंदोलक आक्रमक झाले असून एसटी बसेसची तोडफोड करण्यात येत आहे.