|Tuesday, March 19, 2019
You are here: Home » Top News » ज्यांची जास्त काळजी घेतली, त्यांनीच राष्ट्रवादीला धोका दिला-धनंजय मुडे

ज्यांची जास्त काळजी घेतली, त्यांनीच राष्ट्रवादीला धोका दिला-धनंजय मुडे 

ऑनलाईन टीम / पिंपरी-चिंचवड :

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी पिंपरी-चिंचवड शहरातील असंख्य कार्यकर्ते नेते केले. दादांनी ज्यांची जास्त काळजी घेतली. त्यांनीच राष्ट्रवादी काँग्रेसला धोका दिला आहे. आता राष्ट्रवादीची हवा निर्माण झाली असून गेलेल्यांना परत यावे लागणार. परंतु, पडत्याकाळात सोडून गेलेल्यांसाठी आता राष्ट्रवादीत जागा नाही त्यांचा दि एंड झाला आहे, असे सांगत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप आणि महेश लांडगे यांच्यावर निशाणा साधला आहे.

दादांनी शहरातील अनेकांना नेते केले. महत्वाची पदे देऊनही ते प्रमाणीक राहिले नाहीत. परंतु, वातावरण बदलताच दादांनी ज्यांची काळजी घेतली. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला दगा दिला. लाटेत नको त्या जोरावर निवडून आले आहेत. आता राष्ट्रवादीची हवा निर्माण झाली असून गेलेल्यांना परत यावे लागणार आहे. पण, भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप आणि महेश लांडगे यांना पुन्हा राष्ट्रवादीत एंट्री नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. हल्लाबोल आंदोलनाच्या काळेवीडीतल सभेत देखील धनंजय मुंडे यांनी आमदार जोडगोळीवर जोरदार हल्लाबोल केला होता. विधानसभा निवडणुकीवेळी वेळ बघून तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसला सोडून गेलात. पण जनता तुम्हाला घरी बसविल्याशिवाय राहणार नाही. असा निशाणा त्यांनी आमदारांवर साधला.

Related posts: