|Saturday, December 15, 2018
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » मनसेचे सावंतवाडी आगारात धडक

मनसेचे सावंतवाडी आगारात धडक 

समस्या दूर न केल्यास आंदोलन

सावंतवाडी:

सावंतवाडी आगारातील गळक्या गाडय़ा, गाडय़ांचे गुळगुळीत झालेले टायर, वायफर नसलेल्या गाडय़ा यामुळे होणाऱया अडचणी व धोका तसेच बस स्थानकातील खड्डे व शौचालयाची दुरवस्था आदी प्रश्नासंदर्भात शनिवारी मनसेचे परिवहन सेना जिल्हाध्यक्ष ऍड. राजू कासकर यांच्या नेतृत्वाखाली सावंतवाडी तालुक्यातील पदाधिकाऱयांनी आगाराला धडक देत आगार व्यवस्थापकांना जाब विचारला. येत्या आठ दिवसात मागण्यांबाबत कार्यवाही न केल्यास मनसेच्या आंदोलनाला तोंड द्यावे लागेल, असा इशारा व्यवस्थापक एस. बी. सय्यद यांना देण्यात आला. याबाबत मनसेतर्फे लेखी निवेदन देण्यात आले.

आगारातील बऱयाच गाडय़ांची दयनीय अवस्था आहे. गळक्या गाडय़ा, गुळगुळीत टायर, बंद असलेले वायफर अशी परिस्थिती आहे. त्यामुळे वाहक व चालकांना जीवावर उदार होऊन प्रवाशाना सेवा देताना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. आगार परिसरात पडलेल्या खड्डय़ांमुळे प्रवासी व चालकांना त्रास होत आहे. यावेळी चार दिवसात खड्डे भरण्याचे आश्वासन अधिकाऱयांनी दिले. सुलभ शौचालयाच्या दुरवस्थेबाबतही अधिकाऱयांचे लक्ष वेधले. शौचालयात दरपत्रक लावावे, महिलांसाठी मोफत सेवा असताना पैसै आकारण्यात येतात. याबाबत दखल घेऊन ठेकेदाराला सूचना करावी, अशी मागणी करण्यात आली. मागण्या आठ दिवसात न सोडविल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला. यावेळी शिष्टमंडळात संतोष भैरवकर, अतुल केसरकर, सुधीर राऊळ, महेश बांदिवडेकर, आशिष सुभेदार, विनोद पोकळे, संदीप खानविलकर, प्रमोद तावडे, समीर गावडे, विठ्ठल गावडे यांचा सहभाग होता. यावेळी सुलभ शौचालय व आगारात पडलेल्या खड्डय़ांची पाहणी करण्यात आली. यावेळी स्थानकप्रमुख नीलेश वारंग, वाहतूक नियंत्रक विशाल देसाई उपस्थित होते.

Related posts: