|Sunday, August 25, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » पूज्य महाजगद्गुरू माता गंगादेवी यांचे विश्वधर्म प्रवचनास शुभारंभ

पूज्य महाजगद्गुरू माता गंगादेवी यांचे विश्वधर्म प्रवचनास शुभारंभ 

प्रतिनिधी/ इचलकरंजी

महाजगद्गुरू माता गंगादेवी बसवधर्मपिठ, कुडलसंगम यांचे विश्वधर्म प्रवचनाचा शुभारंभ दत्तनगर-कबनूर येथे उतहात संपन्न झाले. प्रवचनाचा कार्यक्रम रोज सायंकाळी 7.00 ते 8.30 असे पंधरा दिवस चालणार आहे.

स्वागत व प्रास्ताविक आप्पासाहेब गोकावे व दंडाप्पा मगदूम यांनी केले. प्रथम विश्वगुरू महात्मा बसवेश्वराच्या प्रतिमेचे पूजन अवधूत कलगोंडा या दांपत्यांच्या हस्ते करण्यात आले. दिपप्रज्वलन जिल्हा परिषद सदस्या सौ. विजया पाटील, लिंगायत सेवाभावी संघाचे अध्यक्ष आण्णासाहेब शहापुरे व बी. डी. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. बसव ध्वजारोहन नागेंद्र पाटील यांनी केले.

प्रवचन म्हणजे प्रसाद, आत्मतृप्तीसाठी आत्मबल, धैर्य, आचारविचार पाहिजे. तन-मन आत्म्यातून पूजा, ध्यान, प्रार्थना चिंतन मध्येच आनंद आहे. वचन साहित्याचा प्रचार व प्रसार फक्त कर्नाटक व महाराष्ट्रात नसून संपूर्ण विश्वात झाला असल्याचे पूज्य जगद्गुरू माता गंगादेवी यांनी आशिर्वचनात सांगितले.

यावेळी लिंगायत सेवाभावी संघाचे बसगोंडा बिरादार, स्नेहबंध फौंडेशनचे संस्थापक शिवगोंडा पाटील, अजीत जैनापुरे, सिद्राम कवळीकट्टी, सदाशिव मधाळे, राजू मगदूम, शिवलिंग पाटील, सिंद्राम कुमसगी, विरूपाक्ष मगदूम, सुशिला दरीबे, नंदा यलाजा सह लिंगायत समाज बांधव, राष्ट्रीय बसव दलचे कार्यकर्ते, शरण, शरणी मोठय़ा संख्येने उपस्थित होते. सुत्रसंचालन अनिमेश व गुरूप्रसाद कोरे यांनी केले.