|Saturday, February 16, 2019
You are here: Home » Top News » शिकारीसाठी बंदुकीची गरज नाही, सावज दमलय : उद्धव ठाकरे

शिकारीसाठी बंदुकीची गरज नाही, सावज दमलय : उद्धव ठाकरे 

ऑनलाईन टीम / मुंबई :

शिवसेनग पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिलेल्या एका मुलाखतीत पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधला आहे. ’सावजाची शिकार मीच करीन. त्यासाठी दुसऱयाची बंदूक वापरणार नाही. शिकारीसाठी आता बंदुकीची गरज नाही. सावज दमलंय,’ अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी भाजपवर हल्ला चढवला आहे.

 

दैनिक ’सामना’ला दिलेल्या मॅरेथॉन मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी देश आणि राज्याच्या राजकारणावर भाष्य करत भाजपच्या कारभारावर चौफेर हल्ला चढवला. ’माझ्या खांद्यावर कुणाचीही बंदूक नाही. बंदूक माझ्या हातात आहे. त्यामुळे सावज टप्प्यात आल्यानंतरच बार उडवणार,’ असं सांगतानाच ’काही वेळा सावजावर गोळी मारण्याची गरजच नसते. ते पळून पळून पण पडू शकतं,’ असा खोचक टोला उद्धव यांनी भाजपला हाणला. तसेच ’ज्या शिवाजी महाराजांनी कृष्णाने सांगितलेली गीता अंमलात आणली. त्या शिवरायांच्या पुतळय़ाची उंची कसली मोजताय?,’ असे फटकारेही त्यांनी भाजपला लगावले.

 

Related posts: