|Thursday, July 18, 2019
You are here: Home » Top News » जाधव दाम्पत्याला शासकीय पूजेचा मान,मुख्यमंत्र्यांची ‘वर्षा’वर विठूपूजा

जाधव दाम्पत्याला शासकीय पूजेचा मान,मुख्यमंत्र्यांची ‘वर्षा’वर विठूपूजा 

ऑनलाईन टीम / पंढरपूर :

आषाढी एकादशी निमित्ता लाखो भाविकांच्या मेळा पंढरपुरात दाखल झाला आहे. पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास विठूरायाची शासकीय महापूजा पार पडली.मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीत यंदा पुजेचा मान हिंगोलीच्या जाधव दाम्पत्याला मिळाला. अनिल जाधव आणि वषा जाधव यांनी विठ्ठल आणि रूक्मीणीची महापूजा केली. जाधव दाम्पत्य हे शेणगाव तालुक्यतील भगवती गावचे रहिवासी आहेत.

शेतकऱयांच्या मालाला हमीभाव मिळावा अशी मागणी विठ्ठलाकडे केल्याचे यावेळी जाधव दाम्पत्याने सांगितले. महापूजेवेळी जलसंपदामंत्री गिरीश महाजन , परिवहनमंत्री दिवाकर रावते, दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांच्यासहा शिवसेनेचे खासदार अनिल देसाई उपस्थित होते.दरम्यान,पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराला आषाढी एकादशीच्या निमित्ताने खास रोषणाई करण्यात आली आहे.