|Thursday, July 18, 2019
You are here: Home » Top News » चंद्रभागेतीरी जमला 10 लाख वैष्णवांचा मेळा

चंद्रभागेतीरी जमला 10 लाख वैष्णवांचा मेळा 

ऑनलाईन टीम / पंढरपूर :

आषाढी एकादशीच्या सोहळय़ाला पंढरपुरात भक्तीमय वातावरणात सुरुवात झाली आहे. चंद्रभागेत स्नान केल्यानंतर वाळवंटात हरीनामाचा गजर करत वारकऱयांनी दर्शन रांगेकडे प्रस्थान केले आहे. आज विठू-माऊलीचे दर्शन घेण्यासाठी अंदाजे 10 लाखांपेक्षा जास्त भाविक पंढरपूरात दाखल झाले आहेत. त्या पार्श्वभूमीवर कडक पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे.

विठ्ठलभेटीच्या ओढीने गेल्या महिनाभरापासून उन,पाऊस आणि वाऱयाची तमा न बाळगता विठ्ठलनामाचा जप करत पंढरीच्यादिशेने चालणारी पाऊले आज पंढरपूरात पोहोचली आहेत. तर ज्ञानेश्वर माऊली आणि तुकोबा माऊलींच्या पालखीं®ाsही पंढरपुरात आगमन झाले असून लाखो वारकऱयांची पाऊले चंद्रभागेतीरी विसावली आहेत. चंद्रभागेला भरपूर पाणी असून निर्मळ आणि स्वच्छ चंद्रभागेत पवित्र स्नान करण्यासाठी लाखो भाविक नदीपात्रात उतरले आहेत. टाळ, मृदंगाच्या गजरात पंढरीत विठूरायाचा जप सुरु आहे. अवघी पंढरी विठुनामाच्या गजरात दुमदुमली असून चोहीकेड वारकरीच दिसत आहेत. बा विठ्ठलाचे दर्शन घेऊन पंढरीच्या तीवावर बहुतांश वारकरी जमले आहेत. तर विठ्ठलभेटीची ओढ लागलेले भाविक दर्शन रांगेत उभे आहेत.