|Monday, April 22, 2019
You are here: Home » Top News » मुंबईतील हॉस्पिटलमध्ये तरूणाचा संशयास्पद मृत्यू

मुंबईतील हॉस्पिटलमध्ये तरूणाचा संशयास्पद मृत्यू 

ऑनलाईन टीम / मुंबई :

सायन येथील टिळक हॉस्पिटलमध्ये एका तरूणाचा उपाचारदारम्यान संशयास्पद मृत्यू झाला. मृत मुलाच्या नातेवाईकांनी आपला राग पोलिसांच्या गाडय़ावर काढला. या घटनेत दोन पोलिस आणि महाराष्ट्र सुरक्षा दलाचे तीन जवान जंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणी सायन पोलिसांनी 100 अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला करण्यात आला आहे. जखमी जवानांवर टिळक हॉस्पिटलमध्ये दाखल करण्‍³ाात आले आहे.

मिळालेली माहितीनुसार, धारावी पोलिसांनी चोरीप्रकरणी येथील सचिन रवींद्र जैस्वार नावाच्या तरूणाला ताब्यात घेतले होते. पोलिसांनी सचिनला बेदम मारहाण केली होती. त्याने गुन्हा कबुल केला नाही म्हणून त्याला शुक्रवारी त्याला सोडूनही दिले होते. त्यानंतर त्याची तब्येत बिघडली म्हणून त्याचा नातेवाईकांनी शनिवारी टिळक हॉस्पिटलमध्ये दाखल केले. शनिवारी रात्री 11 वाजेच्या दरम्यान त्याचा अचानक मृत्यू झाला. पोलिसांनी बेदम मारहाण केल्यामुळेच सचिनचा मृत्यू झाल्याचा आरोप सचिनच्या वडिलांनी केला आहे. सचिनला लेप्टो स्पायरोसिस झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. पोलिस खोटे सांगत असल्याचे म्हणत सचिनचे नातेवाईक आणि मित्रांनी पोलिसांच्या गाड्यांवर दगडफेक केली.

Related posts: