|Thursday, July 18, 2019
You are here: Home » Top News » मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाची माफी मागावी ; मराठा क्रांती मोर्चा समन्वयकाची मागणी

मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाची माफी मागावी ; मराठा क्रांती मोर्चा समन्वयकाची मागणी 

ऑनलाईन टीम / पुणे :

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाचा अवमान केल्याबद्दल मराठा समाजाची जाहीरपणे माफी मागावी, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक प्रवीण गायकवाड यांनी पुण्यात केली आहे.

मुख्यमंत्र्यांनी पंढरपूरला पूजेसाठी व दर्शनासाठी येण्याविषयी घातपात होण्याची शक्मयता असल्याचे जाहीर केले. त्यांनी तो अहवाल जाहीर करावा अशी मागणी त्यांनी केली. मराठा समाजासाठी आरक्षणाची मागणी करणारी मुलेही वारकऱयांचीच मुले आहेत. त्यामुळे त्यांना घातपाती ठरविणे हा तमाम वारकऱयांना अपमान आहे अशी टीका त्यांनी केली. काल मुख्यमंत्र्यांचा वाढदिवस होता. त्यावेळी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा मुंबई दौऱयावर होते, त्यामुळे त्यांनी पंढरपूरला येण्याचे रद्द केले. परंतु त्याचे खापर मात्र गोरगरीब जनतेवर फोडले आणि वारकऱयांसोबत महाराष्ट्रातील जनतेचीही दिशाभूल आणि फसवणूक केली असा दावाही त्यांनी केला. सरकार स्वतः कोर्टात लवकर अहवाल देत नसल्याने आरक्षण मिळण्यास उशीर होत आहे असेही ते म्हणाले.