|Saturday, August 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » स्पर्धा परिक्षेच्या दालनामध्ये प्रवेश करण्याअंगोदर स्वतःची ओळख करून घ्या

स्पर्धा परिक्षेच्या दालनामध्ये प्रवेश करण्याअंगोदर स्वतःची ओळख करून घ्या 

प्रतिनिधी /शिरोळ :

स्पर्धा परिक्षेच्या दालनामध्ये प्रवेश करण्याअंगोदर स्वतःची ओळख करून घ्या. आज स्पर्धा परीक्षेचे दालन सर्वांसाठी खुले आहे. स्वतःच्या क्षमता आजमावून मगच या क्षेत्रामध्ये प्रवेश करा. केवळ स्पर्धा परिक्षेला बसायचे म्हणून वर्गाला जावू नका. तर किमान सामान्य ज्ञान आपल्याला व्हावे म्हणून प्रवेश घ्या, असे मत ऍड. श्रीकांत माळकर यांनी व्यक्त केले.

येथील श्री पद्माराजे विद्यालय व ज्युनिअर कॉलेजमध्ये कर्मवीर स्पर्धा परिक्षा प्रबोधिनीचे उद्घाटन माजी जिल्हा परिषद सदस्य व स्कूल कमिटी सदस्य अमरसिंह माने-पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी ऍड. माळकर बोलत होते. पोलीस उपनिरीक्षक पूनम रूग्गे, स्कूल कमिटी सदस्य माजी प्राचार्य श्रीयुत संकपाळ, पर्यवेक्षक सी. डी. कदम, सुभाष माळी, पोलीस नाईक मनोज मोहिते, एस. आर. पाचोरे, आर. एस. पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती.

ऍड. माळकर म्हणाले, स्पर्धा परीक्षेची सुरवात लहान पणापासूनच होते. शाळेमध्ये विद्यार्थ्यांना अनेक स्पर्धा परीक्षा द्याव्या लागतात. करिअर ठरविण्याची, स्वतःला आजमावून पाहण्याची हीच वेळ आहे. पाचवी ते दहावीचा पाया चांगला असेल तर स्पर्धा परीक्षा अवघड नाही. ध्यैर्याने पेटून उठा आणि या क्षेत्रामध्ये प्रवेश करा. अभ्यास करण्याची तयारी असेल, आत्मविश्वास असेल, जबरदस्त इच्छा असेल तर कोणत्याही विभागातील विद्यार्थी स्पर्धा परीक्षेमध्ये यशस्वी होवू शकतो.

पोलीस उपनिरीक्षक पूनम रूग्गे यांनी निर्भया पथकांतील आपले अनुभव विद्यार्थ्यांना सांगितले. अकरावीमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. स्वागत प्राचार्य बी. एस. कनप यांनी केले. प्रास्ताविक कर्मवीर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन प्रबोधिनीचे समन्वयक एम. आर. पाटील यांनी केले. पाहुण्यांचा परिचय ए. डी. पुजारी यांनी केले. यावेळी शिक्षक, †िशक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी, विद्यार्थिंनी मोठय़ा संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन सौ. व्ही. एस. बरगे व सौ. एस. एस. पाटील यांनी केले. आभार सी. डी. कदम यांनी मानले.