|Tuesday, July 16, 2019
You are here: Home » उद्योग » वर्षभरात सेन्सेक्स 44 हजारवर

वर्षभरात सेन्सेक्स 44 हजारवर 

वृत्तसंस्था /नवी दिल्ली :

आगामी सार्वत्रिक निवडणुकांत सत्ताधारी रालोआला अपेक्षित बहुमत न मिळाल्यास जून 2019 दरम्यान सेन्सेक्स 36,000 दरम्यान कायम असेल. मात्र निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळाल्यास 44 हजारांचा टप्पा पार करेल असे मॉर्गन स्टॅनली या आंतरराष्ट्रीय गुंतवणूक बँकेने म्हटले.

काही विदसांपूर्वी घसरण झालेल्या भारतीय बाजारात पुन्हा तेजी परतत आहे. उभरत्या अर्थव्यवस्थांबरोबर देशातील समभागात कमजोरी, कच्च्या तेलाच्या उच्च किमती, निवडणूक वर्ष आणि मिडकॅप समभागातील फुगवडा यामुळे निर्देशांक उच्चांकावर पोहोचले आहेत. विकास दरात वाढ, मजबूत मायक्रो स्थिरता आणि स्थानिक गुंतवणूक यामुळे लार्ज कॅप निर्देशांकात तेजी येत आहे, असे मॉर्गन स्टॅनलीने म्हटले.

2018 या आर्थिक वर्षात उत्पन्नात 5 टक्के वाढ, 2019 मध्ये 23 टक्के आणि 2020 मध्ये 24 टक्के दिसून येईल. सरकारची धोरणे आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील संकेत यासह सरकार स्थिर असल्यास वर्षभरात सेन्सेक्स 44 हजारावर पोहोचेल. इंडिया इक्विटी स्टॅटेजी या अहवालात बाजारासाठी मदत करणारी 6 कारणे सांगण्यात आली आहेत. आरबीआयचे धोरण, रिअल इस्टेट क्षेत्रात सकारात्मकता, यील्ड, देशांतर्गत मजबूत मागणी, अन्य उभरत्या अर्थव्यवस्थांबरोबरचे संबध यामुळे बाजारात परिणाम दिसून येईल.