|Thursday, July 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » दोडामार्गातील कॉजवे पाण्याखाली

दोडामार्गातील कॉजवे पाण्याखाली 

प्रतिनिधी / दोडामार्ग:

रविवारी दिवसभर मध्यरात्री कोसळलेल्या पावसामुळे सोमवारी सकाळी तालुक्याला केर, मोर्ले, घोटगेवाडी येथील कॉजवे पाण्याखाली गेले होते. त्यामुळे या तिन्ही गावांचा संपर्क तुटला होता.

रविवारी मुसळधार कोसळलेल्या पावसाचा फटका तिलारी पंचक्रोशीला बसला. येथील कमी उंचीचे कॉजवे पाण्याखाली गेले होते. परिणामी या गावची मुख्य बाजारपेठ असलेल्या साटेली भेडशीचा संपर्क तुटला. शिवाय उच्च शिक्षणासाठी दोडामार्गला येणाऱया विद्यार्थ्यांचेही शैक्षणिक नुकसान झाले.

गेल्या दहा दिवसांपासून पाण्याखाली

केर-मोर्ले-घोटगेवाडी या गावांसाठी शॉर्टकट असणारा रस्ता म्हणजे कोनाळकट्टा घोटगेवाडी होय. या मार्गावरील घोटगेवाडी येथील कॉजवे पाण्याखाली गेला आहे. तिलारी प्रकल्पाने अतिरिक्त पाणी सोडल्याने हा कॉजवे गेल्या दहा दिवसांपासून पाण्याखाली आहे.