|Monday, July 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » जगन्नाथ पेडणेकर ज्वेलर्सचे सावंतवाडीत थाटात उद्घाटन

जगन्नाथ पेडणेकर ज्वेलर्सचे सावंतवाडीत थाटात उद्घाटन 

पहिल्याच दिवशी असंख्य ग्राहकांची भेट

 

सावंतवाडी : पेडणेकर ज्वेलर्समधील दागिन्यांची पाहणी करतांना नारायण राणे, नीलम राणे. अनिल भिसे

प्रतिनिधी / सावंतवाडी:

कलाकुसरीच्या दागिन्यांसाठी प्रसिद्ध जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्सच्या अकराव्या पेढीचे शानदार उद्घाटन सोमवारी येथील कॉलेज रोडवरील रामेश्वर प्लाझा संकुलात महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष खासदार नारायण राणे यांच्या हस्ते झाले. झाले. चिपळूणच्या स्वरब्रह्म ढोलपथकाने उद्घाटन सोहळय़ात अधिकच रंगत आणली. राणे यांनी पेढीची पाहणी करून ग्राहकांना सर्व प्रकारच्या सुवर्णलंकार खरेदीसाठी दालन उपलब्ध करून दिल्याबद्दल जगन्नाथ पेडणेकर ज्वेलर्सचे कौतुक केले.

यावेळी नीलम राणे, जि. प. अध्यक्षा रेश्मा सावंत, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत, जि. प. माजी अध्यक्ष अशोक सावंत, सभापती रवींद्र मडगावकर, उपसभापती निकिता सावंत, स्वाभिमानचे प्रदेश सरचिटणीस संदीप कुडतरकर, तालुकध्यक्ष संजू परब, जि. प. सदस्या शर्वणी गावकर, नगरसेवक राजू बेग, सुधीर आडिवरेकर, दीपाली भालेकर, माजी सभापती प्रमोद सावंत, ऍड. परिमल नाईक, उत्कर्षा सासोलकर, उदय नाईक, दिलीप भालेकर, पेडणेकर ज्वेलर्सच्या संचालिका जयश्री जगन्नाथ पेडणेकर, संचालक आनंद जगन्नाथ पेडणेकर, संचालिका आसावरी आनंद पेडणेकर, शिवानंद पेडणेकर आदी उपस्थित होते.

प्रारंभी संचालिका जयश्री पेडणेकर, आसावरी पेडणेकर, संचालक आनंद पेडणेकर यांनी खासदार राणे, नीलम राणे यांचे स्वागत केले. पेडणेकर ज्वेलर्सच्या सावंतवाडीतील पेढीमध्ये असंख्य डिझाईन्सचे दागिने आहेत. या दागिन्यांची पाहणी खासदार राणे आणि नीलम राणे यांनी केली. या पेढीमुळे विविध डिझाईन्सचे दागिने ग्राहकांना एकाच छताखाली खरेदी करता येणार आहेत. ही संधी पेडणेकर ज्वेलर्सने सावंतवाडीकरांना उपलब्ध करून दिली. त्याबद्दल राणे यांनी पेडणेकर ज्वेलर्सचे कौतुक केले. पेडणेकर ज्वेलर्सच्या मुंबईतील दादरमध्ये तीन शाखा तसेच वाशी, डोंबिवली, पनवेल, विरार, मुलुंड, रत्नागिरी, चिपळूण येथे शाखा आहेत. या शाखांमध्ये ग्राहकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. कोकणातही शाखा व्हावी, अशी ग्राहकांकडून मागणी होती. त्यानुसार पेडणेकर ज्वेलर्सने सावंतवाडीत
ग्राहकांच्या मागणीनुसार शाखा सुरू केली. त्याचे उद्घाटन सोमवारी झाले.

एकाच छताखाली असंख्य डिझाईन्स

पेडणेकर ज्वेलर्स नावाजलेले ज्वेलर्स आहे. या ठिकाणी विविध डिझाईन्सचे दागिने विक्रीसाठी ठेवण्यात आले. ते पाहण्यासाठी आणि खरेदीसाठी ग्राहकांनी पहिल्याच दिवशी गर्दी केली होती. दागिन्यांचे दालन पाहून ग्राहकांनी समाधान व्यक्त केले. एकाच छताखाली असंख्य डिझाईन्सचे दागिने पसंतीनुसार खरेदी करण्याची संधी पेडणेकर ज्वेलर्सने उपलब्ध करून दिल्याची प्रतिक्रिया ग्राहकांनी व्यक्त केली. रात्रीपर्यंत पेढीला असंख्य ग्राहकांनी भेट देऊन खरेदी केली. तसेच भिशी योजनेची माहिती घेतली.