|Friday, November 16, 2018
You are here: Home » Top News » काकासाहेब शिंदे यांच्या कुटुंबीयांना मदत जाहीर

काकासाहेब शिंदे यांच्या कुटुंबीयांना मदत जाहीर 

ऑनलाईन टीम / औरंगाबाद :

गंगापूर तालुक्मयातील कायगाव टोका येथे मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी पुलावरुन गोदावरी नदीत उडी मारणाऱया काकासाहेब शिंदे यांच्या कुटुंबियांना जिल्हा प्रशासनाने मदत जाहीर केली आहे. कुटुंबियांना 10 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली असून काकासाहेब शिंदेंच्या भावाला सरकारी नोकरी दिली जाईल, असे जिल्हाधिकाऱयांनी सांगितले.

 

कायगाव टोका येथे मराठा समाजाच्या नेत्यांनी मंगळवारी जलसमाधी घेण्याचा इशारा दिला होता. दुपारी तीनच्या दरम्यान कायगाव टोका येथील गोदावरी नदीवरील पुलाकडे मोर्चेकरी निघाले. त्यांना पोलिसांनी रोखण्याचा प्रयत्न केला. त्यातच काकासाहेब शिंदे यांनी पुलावरून उडी मारली. त्यांचा तेथे मृत्यू झाला. काकासाहेब शिंदे यांच्या कुटुंबियांना मदत जाहीर करावी,अशी मागणी केली जात होती.

 

Related posts: