लोअर परळ रेल्वे पूल बंद असल्याने प्रवाशांची कोंडी

ऑनलाईन टीम / मुंबई :
लोअर परळचा रेल्वे पूल दुरुस्तीसाठी बंद राहणार असल्याचं रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. मात्र पूल परिसरात प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली आहे. लोअर परळ परिसरात अनेक उद्योग- धंदे असून कॉर्पोरेट ऑफिसेस आहेत. त्यामुळे रोजगारासाठी प्रवाशांचे लोंढे सकाळी 9 ते 10 च्या सुमारास येत असतात. मात्र हा पूल बंद असल्याची अनेक प्रवाशांना कल्पना नसल्याने परिसरात गर्दी झाली आहे. पूल बंद झाल्याने ईस्टर्न बेकरीकडे उतरणाऱया जिन्यावर चेंगराचेंगरीची भीती आहे. खबरदारी म्हणून पोलिसांसह रेल्वे प्रशासन आणि पालिकेने उपाययोजना आखण्याची गरज प्रवाशांकडून होत आहे.
मात्र रेल्वे पूल करण्याआधी प्रशासनाने कोणतीही खबरदारी घेतली नसल्याचे तसेच पर्यायी रस्ता उपलब्ध करून दिला नसल्याचे यावरून दिसत आहे. महापालिका काय करत आहे, असा प्रश्न प्रवासी विचारत आहेत.