|Tuesday, July 16, 2019
You are here: Home » Top News » काकासाहेब शिंदेंवर अंत्यसंस्कार ; चंद्रकांत खैरेंना हाकलले

काकासाहेब शिंदेंवर अंत्यसंस्कार ; चंद्रकांत खैरेंना हाकलले 

ऑनलाईन टीम / औरंगाबाद :

मराठा आरक्षणसाठी जलसमाधी घेणारे आंदोलक काकासाहेब शिंदे यांच्या पार्थिवावर कायगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी हजारो लोक उपस्थित होते. शिंदे यांच्या अंत्यसंस्कारासाठी कायगाव येथे आलेले शिवसेना नेते, खासदार चंद्रकांत खैरे यांना यावेळी मराठा तरुणांच्या रोषाला सामोरे जावे लागले. या तरुणांनी जोरदार घोषणाबाजी करत खैरे यांना अक्षरशः हाकलून लावले.

गंगापूर तालुक्मयातील कायगाव येथे आज सकाळी 11 वाजता काकासाहेब शिंदे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. लहान भाऊ अविनाश शिंदे याने काकासाहेबांच्या पार्थिवाला अग्नी दिला. अंत्यसंस्कार सुरू असतानाच शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे घटनास्थळी आले. त्यामुळे मराठा तरूण प्रचंड संतप्त झाले. या तरुणांनी आक्रमक पवित्रा घेत जोरदार घोषणाबाजी केली. या तरुणांनी राज्यसरकार आणि शिवसेनेच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. काही तरूणांनी तर खैरेंच्या अंगावर धावून जात त्यांना अक्षरशः हाकलून दिलं. आम्हाला या ठिकाणी कोणताही लोकप्रतिनिधी नकोय, असं या तरुणांनी स्पष्ट केलं. त्यामुळे तरुणांचं रौद्ररूप पाहून खैरे यांनीही घटनास्थळावरून काढता पाय घेतला. दरम्यान, शिंदे यांच्या मृत्यूप्रकरणी गंगापूरचे तहसीलदार चंद्रकांत शेळके आणि पोलीस निरीक्षक सुनील बिर्ला यांना निलंबित करण्यात आलं आहे.