|Wednesday, June 26, 2019
You are here: Home » Top News » मुंबईत रिक्षावर झाडाची फांदी कोसळून प्रवाशाचा मृत्यू

मुंबईत रिक्षावर झाडाची फांदी कोसळून प्रवाशाचा मृत्यू 

ऑनलाईन टीम / मुंबई :

मुंबईत चालत्या रिक्षावर झाडाची फांदी कोसळून एका प्रवाशाला प्राण गमावावे लागले, तर महिला प्रवासी आणि रिक्षाचावक गंभरि जखमी झाले आहेत. मुलुंड कॉलनीमधील हिंदूस्थान चौकात घडलेल्या या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

मंगळवारी चालत्या रिक्षावर झाडाची फांदी पडली.यामध्ये डोंबिवलीत राहणाऱया 32 वर्षीय शाह याचा मृत्यू झाला तर 27 वर्षीय उर्वी शाह आणि 40वर्षीय रिक्षाचालक चंद्रभान रमाशंकर गुप्त गंभीर जखमी झाले आहेत. मुलुंडमध्ये मुलूंड कॉलनी परिसरात असलेल्या हिंदूस्थान चौकात दुपारी दोन वाजताच्या सुमारास ही घटना घडली आहे. विशेष म्हणजे या झाडाचा फांद्या यापूर्वी तीन वेळा रस्त्यावर कोसळल्या होत्या. यावेळी कोणतीही जखमी झाली नसली तरी स्थानिकांनी याची तक्रार दिली होती. मात्र यावेळी जीवितहानी झाल्यामुळे रहिवाशांनी संतपा व्यक्त केला आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे ही घटना घडल्याचा आरोप केला जात आहे.