|Saturday, April 20, 2019
You are here: Home » Top News » कायगाव टोका येथील आंदोलन अखेर मागे

कायगाव टोका येथील आंदोलन अखेर मागे 

ऑनलाईन टीम / औरंगाबाद :

मराठा मोर्चाच्यावतीने पुणे-औरंगाबाद महामार्गावरील कायगाव टोका येथे कालपासून सुरु असलेले चक्का जाम आंदोलन मंगळवारी संध्याकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास मागे घेण्यात आले. मोर्चाच्या समन्वय समितीचे सदस्य संतोष जाधव यांनी ही माहिती दिली आहे. पंढरपूरहून घरी परतणाऱया वारकऱयांची वाहने याच मार्गावरून जाणार असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज आक्रमक झाला असून काल म्हणजेच सोमवारी औरंगाबादमध्ये आंदोलक तरुणाने गोदावरी नदीत उडी घेऊन आत्महत्या केल्याच्या पार्श्वभूमीवर मराठा क्रांती मोर्चाने आंदोलन तिसऱया दिवशी अधिक तीव्र केले आहे. आज महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. महाराष्ट्र बंदची हाक दिली असली, तरी यामधून अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या आहेत. तसेच आंदोलकांनी बसेसवर दगडफेक करू नये, अशा सूचना समन्वयकांनी दिल्या आहेत.

Related posts: