|Monday, November 19, 2018
You are here: Home » भविष्य » राशिभविष्य

राशिभविष्य 

खग्रास चंद्रग्रहणात काय करावे?

बुध. दि.25 जुलै ते 31 जुलै 2018

27.28 च्या मध्यरात्री खग्रास चंद्रग्रहण होत असून भारतात सर्वत्र हे ग्रहण दिसेल. तसेच संपूर्ण आशिया खंड, युरोप, दक्षिण अमेरिका, रशिया, ऑस्टेलिया, न्य्t़ाझीलंड, पॅसिफिक महासागर, हिंदी महासागर व अटलांटीक महासागर या क्षेत्रात हे चंद्रग्रहण दिसणार आहे. रात्रीच्या दुसऱया प्रहरात हे ग्रहण होत असल्याने दुपारी 12.45 पासून ग्रहणमोक्षापर्यंत वेध पाळावेत. वेधकाळात स्नान, देवपूजा, नित्यकर्मे, जपजाप्य, श्राध्द ही कामे करता येतात. वेधकाळात भोजन निषिध्द आहे. लहान मुले आजारी व अशक्त व्यक्ती तसेच गर्भवतींनी सायंकाळी 5.30 पासूनच वेध पाळावेत. ग्रहणस्पर्श होताच स्नान करावे. पर्वकालामध्ये देवपूजा, तर्पण, श्राध्द, होम व दान करावे. आपल्याला आवडणाऱया मंत्राचे पुरश्चरण करावे. ग्रहण सुटल्यावर पुन्हा स्नान करावे. चंद्र, सूर्य व पृथ्वी यांच्या परस्पर गुरूत्वाकर्षणामुळे या काळात हवामानात अत्यंत सूक्ष्म असे कोटय़वधी विषारी जीवजंतू निर्माण होत असतात. त्यांचा अनिष्ट परिणाम होऊ नये यासाठी ग्रहणकाळात खाणे पिणे निषिध्द मानलेले आहे. गर्भवती महिलांवर ग्रहणाचा परिणाम होण्याची शक्यता असते. त्यासाठी या काळात संतान गोपाल मंत्राचा सतत जप करावा. इतरांनी मृत्युंजयमंत्राचा जप करावा. वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवल्यास ग्रहणाबदलची भीती पूर्ण नष्ट होईल. दर्भ किंवा कुशासन मिळत असेल तर ते जवळ ठेवावे म्हणजे अनिष्ट परिणाम होत नाही. ग्रहण काळात पूजा शांती वगैरे करण्यापेक्षा स्वत: जप करणे अतिशय लाभदायक असते. पत्रिकेत ग्रहण कोणत्या स्थानात होत असते, त्यानुसार त्याचे परिणाम होत असतात. कोणतेही ग्रहण हे शापीत दोष निर्माण करते. कार्यसिध्दी व धुम्रयोगावर होणारे हे चंद्रग्रहण प्रखर शापीत योगात आहे, याचा त्रास होऊ नये यासाठी आपापल्या धर्मानुसार प्रार्थना, मंत्रोच्चारण वगैरे करावेत. हिंदूनी महामृत्युंजय मंत्र, मुस्लीमानी कुराण पठण व गंजुल अर्श, ख्रिस्ती बांधवानी येशू व मेरीची प्रार्थना, पारशी समाजाने अग्यारीत अग्निपूजा आपल्या धर्मगुरूना विचारून करावी. हे ग्रहण घराण्यातील शापाचा गंभीर परिणाम दर्शविणारे आहे. ग्रहणाचा परिणाम एक महिना आधी व पुढे दुसरे ग्रहण होईपर्यत टिकतो. ग्रहण काळात काही लोक देवाना पाण्यात बुडवून ठेवतात, पण हे पूर्ण चुकीचे असून गंभीर दैवी दोष निर्माण करणारे आहे. ग्रहण काळात देवाना पाण्यात बुडवून ठेवल्याने घरातील सदस्यांना मृत्यूसमान संकटे व आर्थिक अडचणी निर्माण होतात, मुले बिघडतात, संसारसुखात बाधा येते, अपमृत्यू येऊ शकतो. देवाना पाण्यात बुडविणे याचा अर्थ मंत्रोच्चाराने अभिषेक करत मूर्तीवर अखंड पाण्याची धार धरणे असा अर्थ आहे.(उत्तरार्ध)

मेष

चंद्रग्रहण दशमात होत आहे. नोकरीत व्यवसायात अत्यंत महत्वाच्या  शुभ घटना घडतील. सर्व कामासाठी यशोवर्धक आहे. रहाती वास्तु, आई व सासू यांच्या बाबतीत मात्र जरा अडचणीचे प्रसंग. तसेच त्यांच्या आरोग्याचीही काळजी घ्यावी लागेल. परदेश प्रवासाच्या प्रतीक्षेत असाल तर हे ग्रहण तुम्हाला निश्चितच अनुकूलता प्रदान करील.


वृषभ

चंद्रग्रहण अत्यंत संमिश्र फळ देईल. प्रवासात त्रास, धोका, फसवणूक, अपघात पैसे व मौल्यवान वस्तू हरवणे यासारख्या घटना घडतील. आतापर्यत शेजारी व नातेवाईकांना मदत केली ते लोक आपणहून तुम्हाला मदतीचे हात पुढे करतील. जर तुम्हाला कोणतेही वाईट व्यसन नसेल तर मोठय़ा कामात अप्रतिम यश मिळेल.


मिथुन

चंद्रग्रहण अनिष्टस्थानी होत आहे. अपघात, आजार, बाधिक पीडा व शापीत योगांचा परिणाम या दृष्टीने हे ग्रहण त्रासदायक आहे. अष्टमात ग्रहण येणे हे जरा तापदायक असते. कोणतेही आर्थिक व्यवहार जपून करावेत. बाधिक ठिकाणी जाणे कटाक्षाने टाळा. तसेच कुणाही अनोळखी व्यक्तीपासून सावध राहिल्यास या ग्रहणाचा काही त्रास होणार नाही.


कर्क

 चंद्रग्रहण वैवाहिक जीवनात काही तरी गोंधळ माजविण्याची शक्मयता आहे. कुणाही परकीय व्यक्तीला आपल्या मनातील गुप्त गोष्टी सांगू नका, त्याचा गैरवापर होऊन संसार बिघडण्याची शक्मयता आहे. भागिदारी व्यवसाय असेल तर आर्थिक घोटाळे उघडकीस येतील. हे ग्रहण शुभ फलदायक नाही. त्यामुळे सर्व बाबतीत सांभाळून रहावे.


सिंह

 चंद्रग्रहण तुम्हाला धनलाभ व सर्व कामात मोठे यश देणारे आहे. लक्ष्मीची कृपा लाभून देणारे असल्याने आतापर्यत अडकलेल्या कामात यश मिळेल, पण त्याचबरोबर शत्रूपीडा निर्माण करणारे योगही आहेत. त्यामुळे जरा सावध रहावे, तुमच्या वैयक्तिक गोष्टी कुणालाही सांगू नका. सहज बोलण्याच्या नादात कुणीतरी त्याचा दुरूपयोग करू शकतील.


कन्या

 पंचमस्थनात चंद्रग्रहण होत आहे. संततीच्या बाबतीत त्रासदायक आहे. मुलांच्या वागण्यात अनपेक्षीत फरक जाणवेल. किरकोळ चुका अथवा काही अपरिहार्य प्रसंगामुळे घरातील वातावरण गढूळ होण्याची शक्मयता आहे. मोठे काम होण्याची शक्मयता असताना अचानक त्यात अडचणी येतील पण त्याचबरोबर नांवलौकीक व प्रति÷ा वाढविणाऱया घटना व मानसन्मान होण्याचे योगही दिसतात.


तुळ

 चंद्रग्रहण सुखस्थानी होत आहे. कौटुंबिक सौख्याच्या बाबतीत चांगले नाही. प्रखर वास्तुदोष निर्माण करणारे ग्रहमान आहे. त्यासाठी शांती वगैरेमागे न लागता कुलदेवता पूजन व स्वच्छतेला प्राधान्य द्या. नोकरी व्यवसायात कुणाचे मन दुखविले जाणार नाही याची काळजी घ्या. बाधिक ठिकाणी जाण्याचे टाळा अन्यथा तीच पीडा घरी येऊ शकते. 


वृश्चिक

चंद्रग्रहण तृतीयात होत आहे. तुम्हाला सर्व बाबतीत चांगले फळ देणारे आहे. सुखसमृद्धी धनलाभ यांचा लाभ होईल, पण त्याचबरोबर एखाद्या पूर्वीच्या प्रकरणी चौकशी करणारा सरकारी ससेमिराही मागे लागेल. प्रवास अथवा कोणतेही काम करताना कुणाची वाईट नजर पडणार नाही यासाठी जपावे.


धनू

 चंद्रग्रहण आर्थिक बाबीवर अनिष्ट परिणाम करण्याची शक्मयता आहे. त्यामुळे आगामी काळात कोठेही गुंतवणूक करताना डोळय़ात तेल घालून काळजी घ्यावी लागेल. काही जबाबदाऱया पडतील. मनात नसतानाही त्या स्वीकाराव्या लागतील. डोळय़ांची काळजी घ्यावी. कुणी काही खाण्यापिण्यास दिल्यास ग्रहणकाळात ते टाळावे.


मकर

चंद्रग्रहण तुमच्या राशीत होत आहे. आरोग्याच्या बाबतीत त्रासदायक ठरेल. काही मानसिक  ताणतणावही वाढतील. तुमची काहीही चूक नसताना इतरांची बोलणी खाण्याचे प्रसंग येतील. पण सावध राहून येणाऱया प्रसंगाला तोंड द्या. सासू, सून वादाला तोंड फुटण्याची शक्मयता. सांभाळावे.


कुंभ

अनिष्ट स्थानी होणारे चंद्रग्रहण त्रासदायक आहे. त्यासाठी सर्व बाबतीत सांभाळावे गुप्तशत्रूंच्या कारवाया वाढतील. करणीबाधा, विषप्रयोग यांची शक्मयता राहील. निष्कारण काहीजण  तुम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न करतील, पण सावधगिरी बाळगलात तर हेच ग्रहण तुम्हाला दैवी शक्तीची कृपाही मिळवून देईल.


मीन

चंद्रग्रहण लाभात होत आहे. तुम्हाला सर्व बाबतीत लाभदायक ठरेल. आर्थिक दृष्टय़ा मोठमोठे लाभ होतील. सायकलने  हिंडत असाल तर कारगाडीतून फिरण्याचे योग दिसतात. मित्रमंडळी अनेक बाबतीत सहाय्यक ठरतील. घरादारासाठी प्रयत्न केला असाल तर हमखास यश, संततीच्या बाबती मात्र जरा काळजी घ्यावी लागेल.

Related posts: