|Wednesday, July 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » मुंबई » सीमाप्रश्नी मुंबई येथे उद्या महत्त्वाची बैठक

सीमाप्रश्नी मुंबई येथे उद्या महत्त्वाची बैठक 

बेळगाव/ प्रतिनिधी

सीमाप्रश्नी सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या याचिकेची सुनावणी जुलै 2017 मध्ये झाली होती. पण वकिलांच्या अनुपस्थितीमुळे न्यायालयाचे कामकाज झाले नाही. त्यानंतर सुनावणीबाबत ‘तारीख पे तारीख’ सुरू आहे. यामुळे  सुनावणीबाबत गुरुवार दि. 26 रोजी मुंबई मंत्रालय येथे महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे.

सीमाप्रश्नी सर्वोच्च न्यायालयामध्ये कामकाज प्रगतीपथावर नाही. पण सुनावणीकरिता लागणारी कागदपत्रे व साक्ष नोंदविण्यासाठी आवश्यक ती तयारी महाराष्ट्राच्या वकिलांनी चालविली आहे. न्यायालयातील सुनावणी कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. न्यायालयीन कामकाजाबाबत चर्चा करण्यासाठी शिष्टमंडळाची महत्त्वाची बैठक गुरुवारी मुंबई येथे होणार आहे. यावेळी महाराष्ट्रातील नेतेमंडळींसह वकील तज्ञमंडळी आणि सीमाभागातील नेते मंडळी उपस्थित राहणार आहेत.