|Saturday, April 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » भिडे गुरुजींच्या सभांना परवानगी न दिल्यास न्यायालयात जाणार

भिडे गुरुजींच्या सभांना परवानगी न दिल्यास न्यायालयात जाणार 

प्रतिनिधी/ बेळगाव

श्री शिवप्रति÷ान हिंदुस्थानचे संस्थापक प्रा. संभाजीराव भिडे गुरुजी यांना जिल्हाधिकाऱयांनी 31 पर्यंत बंदीचा आदेश दिला आहे. तो अत्यंत चुकीचा असून तातडीने तो मागे घ्यावा. अन्यथा, त्या विरोधात आम्ही न्यायालयात धाव घेऊ, असा इशारा शिवप्रति÷ान हिंदुस्थान बेळगाव शाखेच्यावतीने जिल्हाधिकाऱयांना निवेदनाद्वारे दिला आहे.

संकेश्वर येथे 21 जुलै रोजी छ. शिवाजी महाराज यांच्या सुवर्ण सिंहासनाच्या प्रचारार्थ सभा होणार होती. पण जिल्हाधिकाऱयांच्या बंदीमुळे ती सभा झाली नाही. संभाजी भिडे गुरुजी यांनी नेहमी देशाविषयी आपले प्रेम दाखविले आहे. त्यांनी अनेक तरुणांना देशप्रेमी बनविण्यासाठी नेहमीच प्रयत्न केले आहेत. महाराष्ट्रातील भीमा-कोरेगाव दंगलीशी त्यांचा काडीमात्र संबंध नसताना दंगल घडविल्याचा खोटा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. हे कारण पुढे करून कर्नाटक सरकार त्यांच्यावर कर्नाटकात बंदी लादत आहे, हे अत्यंत चुकीचे आहे.

भीमा-कोरेगाव दंगल घडली त्याबद्दल महाराष्ट्र सरकारने भिडे गुरुजींचा कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे, असे असताना कर्नाटक मात्र त्यांच्यावर बंदी घालते, हे अत्यंत चुकीचे आहे. ऑगस्ट महिन्यात सुवर्ण सिंहासनसह पुनर्स्थापना व खडा पहारा प्रचारासाठी बेळगावात सभा घेणार आहेत. तेव्हा त्यांना परवानगी द्यावी, अशी मागणी या निवेदनाद्वारे केली आहे. जिल्हा प्रशासनाने याची दखल घेतली नाही तर न्यायालयात आम्ही जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

शिरस्तेदार मंजुनाथ जानकी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष किरण गावडे, अजित जाधव, कार्यवाह विश्वनाथ पाटील, अभिजीत चव्हाण, चंद्रशेखर चौगुले, पुंडलिक चव्हाण, महेश नाईक, परशराम कोकितकर, अंकुश केसरकर, मनोहर शिरोडकर, प्रफुल्ल शिरवलकर, कल्लाप्पा पाटील, सागर पाटील, चेतन माने, गजानन निलजकर, शुभम मोरे, नितीन कुलकर्णी, गजानन पाटील, चंद्रकांत चौगुले यांच्यासह शिवप्रति÷ान हिंदुस्थानचे कार्यकर्ते उपस्थित होते.   

Related posts: