|Monday, April 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » स्व. विक्रमसिंह घाटगे यांच्या जयंतीनिमित्त एकोंडीत वह्यांचे वाटप

स्व. विक्रमसिंह घाटगे यांच्या जयंतीनिमित्त एकोंडीत वह्यांचे वाटप 

वार्ताहर / सिध्दनेर्ली

स्वर्गीय राजे विक्रमसिंह घाटगे यांच्या जयंतीनिमित्त विद्या मंदिर, एकोंडी येथे  विद्यार्थ्यांना वह्या वाटप कार्यक्रम घेण्यात आला. वह्यांचे वाटप जिजाऊ महिला  संघटनेच्या अध्यक्षा सौ. नवोदीता घाटगे यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी सौ. कलावती पाटील होत्या .

यावेळी बोलताना सौ. नवोदीता घाटगे म्हणाल्या, विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबर वेगवेगळे छंद जोपासले पाहिजेत. आपले भविष्य आपल्या हातात आहे, ते घडविण्यासाठी भरपूर अभ्यास  करा. त्या बरोबर आपले आचार आणि  विचार चांगले ठेवा.  स्वागत संगिता धनवडे यांनी केले. प्रास्ताविक मुख्याध्यापक नारायण घाटगे यांनी केले. यावेळी निलिमा पाटील, राजाराम सांडुगडे, कु. अनुष्का संकपाळ यांची भाषणे झाली.

शालेय शिक्षण कमिटीच्या अध्यक्षपदी निवड झालेबद्दल संदिप साळोखे, व उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल मेघा मगदूम यांचा सत्कार सौ. नवोदीता घाटगे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी शाहू कारखान्याचे माजी संचालक अण्णासो सांडुगडे, शाहू संघाचे संचालक रामचंद्र वैराट, हिंदुराव मगदूम, सर्जेराव परीट, सौ. रूपाली सांडुगडे, कृष्णाबाई कुंभार, वनिता वैराट, निवास संकपाळ, सुनिल मगदूम यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी, पालक,  शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन एस. आर. मगदूम यांनी केले. आभार कविता परीट यांनी मानले.                       

 

Related posts: