|Monday, July 22, 2019
You are here: Home » Top News » शेअर बाजारात ऐतिहासिक उच्चांक, 37 हजारांचा टप्पा पार

शेअर बाजारात ऐतिहासिक उच्चांक, 37 हजारांचा टप्पा पार 

ऑनलाईन टीम / मुंबई :

शेअर बाजारात आज सकाळीच मोठी तेजी पाहायला मिळाली. मुंबई शेअर बाजारात सेन्सेक्सने प्रथमच 37 हजारांचा टप्पा पार केला आहे. आज बाजार खुला होताच निर्देशांकात 70.15 अंकांची म्हणजेच 19 टक्क्यांची वाढ झाल्याचे दिसले. सुरुवातीला निर्देशांक 36,928 अंशांवर खुला झाला. त्यानंतर काही वेळातच निर्देशांकाने 37,074.65 चा आकडा गाठला. तर निफ्टीमध्येही तेजी आली आहे.

मुंबई आणि भारतीय शेअर बाजारात निर्देशांकाने आज मोठय़ प्रमाणात उसळी घेतली. त्यामुळे मुबई शेअर बाजाराचा निर्देशांकाने 37 हजारांचा ऐतिहासिक टप्पा पार केला. तर निफ्टीमध्ये वाढ झाली आहे. सकाळी बाजार खुला झाला तेव्हा, निफ्टी 11,140 अशांवर होता. त्यानंतर काही वेळातच निफ्टी 50 आणि 30 तेजी पाहायल मिळाली. दरम्यान, बुधवारीही शेअर बाजारात तेजी दिसून आली. निर्देशांकात 33.13 अंकांची वाढ होऊन निर्देशांक 36,858.23 अंशांवर बंद झाला होता. तर निफ्टीमध्ये 2.3 अकांची घसरण झाली होती. त्यावेळी निफ्टी 11,132 अशांवर बंद झाला.