|Thursday, July 18, 2019
You are here: Home » Top News » नाशिकमधील आणखी एका आमदाराचा राजीनामा

नाशिकमधील आणखी एका आमदाराचा राजीनामा 

ऑनलाईन टीम / नाशिक :

मराठा आरक्षण मागणीसाठी सकल मराठा समाजाच्या आवाहनाला प्रतिसाद देत नाशिक मधील देवळाचांदवड मतदार संघातील आमदार डॉ राहुल आहेर आणि पश्चिम नाशिक मतदार संघाच्या आमदार सीमा हिरे यांनी आज आमदारकीचा राजीनामा मराठा क्रांती समाजाच्या समन्वयकांकडे सुपूर्द केला आहे.

समाजाच्या वतीने आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यलयासमोर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळय़ाजवळ बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले असून त्या ठिकाणी हे राजीनामे दिले. अर्थात हे राजीनामे त्यांनी समाजाकडे दिले असून विधानसभा अध्यक्षांकडे दिलेले नाहीत. समाज मोठा असल्याने हे राजीनामे त्यांच्याकडे दिल्याचे आहेर आणि हिरे यांनी सांगितले. पश्चिम विधानसभा मतदार संघातील भाजपच्या आमदार थोडय़ाच वेळात सकल मराठा मोर्चा समन्वयकांशी संपर्क साधून आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याची माहिती मिळत आहे. चांदवडचे भाजपाचे आमदार डॉ. राहुल अहेर यांनी समन्वयकांकडे राजीनामा सुपूर्द केल्यानंतर आमदार सीमा हिरे यांनीही मराठा क्रांती मोर्चा समन्वयांकाकडे आपला राजीनामा सुपूर्त केला आहे. हिरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर त्या जिह्यातील दुसऱया तर शहरातील पहिल्या राजीनामा देणाऱया आमदार ठरतील. त्यामुळे आता नाशिक जिह्यातील विधानसभा अध्यक्षांकडे कोण प्रथम राजीनामा सुपूर्द करणार याकडे सकल मराठा समाजाचे लक्ष लागले आह. तर मराठा क्रांती मोर्चाचा समाजाचा आमदारांवर दबाव वाढत असून आता जिह्यातील आणखी कोण आमदार राजन पुढे येतात त्याकडेही मराठा समाजाचे लक्ष आहे.