|Monday, June 24, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » ‘जिनांचे स्वप्न पूर्ण करायचे आहे!’

‘जिनांचे स्वप्न पूर्ण करायचे आहे!’ 

सार्वत्रिक निवडणुकांमध्ये पाकिस्तानच्या सत्तेचे बॅटींग इम्रान खान यांना मिळत आहे. पाकिस्तानचे भूतपूर्व पंतप्रधान नवाझ शरीफ, त्यांची कन्या मरिअम आणि जावई निवृत्त पॅप्टन मुहम्मद सफ्दर हे तिघे सध्या तुरुंगात आहेत. लंडनमधील अतिउच्चभ्रू वस्तीत महागडय़ा सदनिका घेण्यासाठी पैसा कुठून आणला हा मुद्दा घेऊन त्यांच्यावर खटला गुदरण्यात आला. कनिष्ठ न्यायालयाच्या निकालाविरोधात शरीफ यांनी उच्च न्यायालयात अपील केले आहे.

पाकिस्तानातील सार्वत्रिक निवडणुकीत नवाझ शरीफ स्वतः भाग घेऊ शकले नाहीत? पण त्यांचा पक्ष दुसऱया क्रमांकावर आला. शरीफ हे लोकशाहीवादी आणि भारतबाबत सौम्य भूमिका घेणारे मानले जातात. अर्थात या दोन्ही गोष्टी पाकिस्तानातील परिस्थिती आणि तेथील राज्यकर्त्यांची मानसिकता या निकषांच्या आधारे मोजावयाच्या आहेत. शरीफांच्या अनुपस्थितीमुळे त्यांचा पक्ष निष्प्रभ होईल आणि कडव्या शक्तीचा प्रभाव पाकिस्तानात वाढेल असे मानले जात आहे.

दरम्यानच्या काळात ‘लष्करे-तोयबा’चा संस्थापक हाफिज सईद याने राजकारणाच्या आखाडय़ात उतरण्यासाठी षड्डू ठोकले आहेत. मुंबईतील बॉम्बस्फोटांमागील कुटिल कारस्थानी म्हणून भारताला हाफिज सईद याचे नाव ठाऊक आहे. हा दहशतवादी निवडणुकीत यशस्वी झाला तर भारताला कोणत्या परिस्थितीला तोंड द्यावे लागेल ते काळच दाखवून देईल. अर्थात पाकिस्तानमध्ये कोणाचेही सरकार येवो, भारताला विरोध आणि भारतातील अतिरेकी कारवायांना फुस आणि पाठबळ हे पाकिस्तानी राज्यकर्त्यांच्या कार्यक्रमातले पहिले कलम असते. हाफिज सईदसारखा दहशतवादी थेट राजकारणात सक्रिय झाला तर भारतातील दहशतवादी कारवाया वाढतील अन्यथा नाही असे मानायचे कारण नाही. हाफिज सईद हा ‘जमात-उद्-दावा’ या संघटनेचा प्रमुख आहे.

या संघटनेतर्फे ‘अल्ला हु अकबर ‘तेहरीक’ (एएटी) च्या झेंडय़ाखाली राष्ट्रीय आणि प्रादेशिक निवडणुका लढवण्यासाठी 265 उमेदवार रिंगणात उतरले आहेत. हे सगळे उमेदवार सकृतदर्शनी ‘मिल्ली मुस्लिम लीग’चे दाखवले जातात. यामध्ये सईदचा मुलगा आणि जावईदेखील आहेत. 265 पैकी 13 महिला आहेत. या उमेदवारांच्या निवडणूक प्रचाराचा धडाका पाकिस्तानात सुरु करण्यासाठी हाफिज सईदने लाहोर परगण्यात अनेक कार्यालये उघडली. प्रचार कार्य सुरू झाले. इक्बाल टाउन या भागात जीप गाडय़ा, ट्रक आणि मोटारसायकली यांचा मोठा ताफा घेऊन ऐटीत दाखल होत हाफिज सईदने छाती दडपून टाकणारे शक्तीप्रदर्शन मागच्या आठवडय़ात केले.

कडवा भारतविरोधी दहशतवादी म्हणून कुप्रसिद्ध असणाऱया सईदने पाकिस्तानातील राजकीय आखाडय़ात उतरताना आपला कार्यक्रम जाहीर केला आहे. भयंकर दहशतवादी कृत्यांबद्दल पकडून देणाऱयास एक कोटी अमेरिकन डॉलरचे बक्षीस लावण्यात आलेला हाफिज सईद स्वतः मात्र उमेदवार म्हणून निवडणुकीत उतरला नाही.

लाहोरमधील प्रचारसभेसाठी जमलेल्या प्रचंड जनसमुदायाचे आपल्याला जोरदार पाठिंबा देत असल्याबद्दल आभार मानून हाफिज सईदने निवडणूविषयक अजेंडा घोषित केला. पाकिस्तान हे आपल्याला अल्लामा इक्बाल आणि कायदे आझम महंमद अली जिना यांच्या स्वप्नातले राष्ट्र म्हणून घडवायचे आहे असे मनोगत त्याने मांडले. सध्या पाकिस्तान जगत असलेली परिस्थिती म्हणजे त्याला ‘काळे युग’ वाटते आणि ते लवकरच नाहीसे होईल, नवा प्रकाश देणारे नवे युग सुरु होईल असा आशावाद त्याने प्रकट केला आह़े अर्थातच हा ‘सैतानी’ आशावाद आह़े ‘जमात उद् दावा’च्या आणखी एका ज्येष्ठ उमेदवाराने आपल्या भाषणात ‘मिल्ली मुस्लिम लीग’ पुढील महत्त्वाची उद्दिष्टे स्पष्ट शब्दात सांगितल़ी मोहम्मद याकूब शेख नावाचा हा उमेदवार म्हणाला, पाकिस्तानचे तत्त्व प्रत्यक्षात उतरविण्यासाठीच सईद यांनी या निवडणुकीच्या आखाडय़ात उडी मारली आह़े मानवतेची सेवा हे यामधील मुख्य तत्त्व आह़े ही मानवतेच्या सेवेच्या तत्त्वाची घोषणा ठीक आहे, पण मोहम्मद याकूब शेखने पाकिस्तान तोंड देत असलेल्या समस्या नष्ट करण्याच्या उद्दिष्टाबरोबरच ‘काश्मीरचे स्वातंत्र्य’ हे पाकिस्तानच्या तत्त्वाचा विषय असल्याचे सांगितल़े भारताविषयी असणारी जन्मजात अढी, काश्मीरमधील घुसखोरी आणि दहशतवादी कारवाया हे गेली सत्तर वर्षे जग पहात आह़े पाकव्याप्त काश्मीर आपलाच आहे असा हेकाही पाकिस्तानने कधी सोडला नाह़ी परंतु काश्मीर स्वतंत्र करायचा आह़े, हा मनसुबा पाकिस्तानने जिनांच्या पश्चात उघडपणे बोलून दाखवला नव्हत़ा हाफिजच्या प्रचारसभांनी ‘हँस के लिया पाकिस्तान, लढ के लेंगे हिंदुस्थान’ या जिनांच्या दर्पोक्तीची आठवण करून दिली आह़े सईद स्वतः निवडणूक उमेदवार नाह़ी परंतु त्याचे अनुयायी आणि त्याच्या दहशतवादी संघटनेचे अनेक सभासद थेट उमेदवारीत आहेत. मात्र त्यांनी निवडणूक लढविण्यासाठी एक कमजोर राजकीय पक्षाचे निशाण उचलले आह़े आपल्याकडे नामचीन गुंड, जमीन माफिया पांढरेशुभ्र कपडे घालून निवडणुकात उतरतात त्यातलाच हा प्रकाऱ राजकारणाचे गुन्हेगारीकरण झालेलेच आह़े परंतु सईदच्या थेट सहभागामुळे आता राजकारणाचे दहशतवादीकरण होऊ घातले आह़े पाकिस्तानच्या राजकरणाशी दहशवाद्यांचा संबंध नवीन नाह़ी मात्र पाकिस्तानचे धोरण लष्करशाहीकडे झुकणारे राहिल़े लोकशाही मनोवृत्तीच्या राष्ट्रप्रमुखाला खाली खेचायचे आणि लष्करशहाने सूत्रे हाती घ्यायची हे तेथे अनेकदा घडले आह़े हाफीज सईदसारखे खतरनाक दहशवादी मात्र ना लोकशाही सरकारने अडवले ना लष्कराने उडवल़े आता तर ते थेट निवडणुकीत उतरत आहेत़ याचा परिणाम गंभीर होईल हे सांगायला ज्योतिषाची गरज नाह़ी खरे म्हणजे पाकिस्तानातील निवडणुकांमध्ये आतापर्यंत मोठय़ा संख्येने दहशवादी पुरस्कृत उमदेवारी झाली नाही हेच आश्चर्य़ आता त्यांना हा नवा मार्ग सापडला आह़े चार दोन आमदार खासदारांचे दहशवाद्यांशी लागेबांधे असणे वेगळे आणि मतपेटीद्वारे जनादेश मिळवून कित्येक दहशतवादधार्जिणे लोकप्रतिनिधी निर्माण होणे वेगऴे असे झाले तर त्यांच्या देशात ते कदाचित ‘प्रकाशमान कालखंड’ सुरू करतील़, भारताबाबत मात्र त्यातून केवळ धोक्यापलीकडे काही निष्पन्न होणार नाह़ी नुकत्याच जाहीर झालेल्या तेथील निवडणूक निकालांमुळे हे होण्याचे लांबणीवर पडले आहे एवढाच दिलासा!

राजेंद्रप्रसाद मसुरकर