|Friday, July 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » मराठयांची आरक्षणासाठी आरपार लढाई

मराठयांची आरक्षणासाठी आरपार लढाई 

विशेष प्रतिनिधी /सोलापूर :

‘अभी नही तो कभी नही’ असा नारा देत मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पेटून उठलेल्या मराठयांनी जिल्हयात आरक्षणची आरपारची लढाई सुरु ठेवल्याचे चित्र आहे. पेटलेल्या आंदोलनांचा आगडोब विझायला तयार नाही. उलट दिवसेंदिवस तो वाढत चालला आहे. शनिवारी आंदोलनास वेगळे वळण लागले. सोलापूर नजीकच्या हिप्परगा तलवात रतिकांत पाटील या मराठा बांधवाने अर्धजल समाधी आंदोलन केले. पंढरपूर तालुक्यातील सुस्ते येथील युवक सचिन शिंगण याने भीमा नदीत उडी मारून जलसमाधी घेण्याचा प्रयत्न केला. त्याच्यावर पंढरपूरच्या उपजिल्हा रूग्णलयात उपचार सुरु आहेत. तर आंदोलनांच्या पेटलेल्या वणव्यात माढा येथे तानाजी पाटील या शेतकऱयांने अंगावर रॉकेल ओतून घेत आरक्षण मागणीच्या पुर्ततेसाठी स्वतःला संपवून आत्मदहनाचा प्रयत्न केला. याशिवाय हजोरो मराठा बांधवांनी रस्त्यावर उतरून अनेक मार्गावर चक्का जाम करत वाहतुक रोखली.

मराठा समाजाच्यादष्टीने आरक्षणाच्या अत्यंत जिव्हाळयाच्या प्रश्नावर सोलापूर शहर व जिह्यात पेटलेल्या आंदोलनाचा वणवा शनिवारीदेखील सलग पाचव्या सहाव्या सुरु आहे. माढा तालुक्यात बहूतांश गावे आज बंद ठेवण्यात आली. पंढरपुर तालुक्यात करकंब गाव पूर्णपणे बंद करण्यात आले. वर्दळीच्या पंढरपूर – टेंभूर्णी रस्यावर टायर पेटवून रास्ता रोको करण्यात आला. कुर्डूवाडी – बार्शी या रस्त्यावरदेखील चका जाम करण्यात आला. माढा येथे दारफळ फाटयावर  मराठयांनी रस्ता अडवून धरला. माढा ते वैराग तसेच माढा ते सोलापूर हे दोन्ही  रस्ते वाहतुकीसाठी बराच वेळ बंद केले.

सोलापूर जिह्याच्या अनेक भागात चकका जाम आंदोलने झाले. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक कित्येक तास खोळंबली होती. यामधून काही प्रवाशांची गैरसोयदेखील झाल्याचे चित्र आहे.