|Wednesday, June 26, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » आंबेनळी घाटात मृत्यूचे तांडव

आंबेनळी घाटात मृत्यूचे तांडव 

प्रतिनिधी /दापोली, खेड :

अभ्यास दौऱयासाठी महाबळेश्वरला निघालेल्या दापोली कृषी विद्यापीठाच्या बस  पोलादपूर येथील आंबेनळी घाटात कोसळून 33 कर्मचारी ठार झाले. या मृत्यूच्या तांडवाने अवघे राज्य हादरून गेले आहे. बसमधील एकमेव प्रवासी बचावला. सायंकाळी उशीरापर्यंत केवळ 17 मृतदेह बाहेर काढण्यात यश आले. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीही राज्य सरकार मृतांच्या नातेवाईकांच्या दुःखात सहभागी असल्याचे सांगून कुटुंबीयांना 4 लाखांची मदत जाहीर केली आहे.

  विक्रांत शिंदे (43, प्रभूआळी, दापोली), सचिन गिम्हवणेकर (36), नीलेश तांबे (32), संतोष झगडे (36), संजीव झगडे (42), सचिन झगडे, प्रमोद शिगवण (सर्व गिम्हवणे, दापोली), राजेंद्र रिसबूड (46, फॅमिलीमाळ, दापोली), प्रशांत भांबिड (33, जालगांव-पांगारवाडी), रतन पागडे (चंद्रनगर, दापोली) यांचे मृतदेह महाबळेश्वर येथील सहय़ाद्री ऍडव्हॅन्चर ट्रेकर्स व महाबळेश्वर ट्रेकर्स ग्रुपच्या सहाय्याने बाहेर काढण्यात आले. राजेंद्र बंडबे, हेमंत सुर्वे, सुनील कदम, रोशन तबीब, संदीप सुवरे, प्रमोद जाधव, विनायक सावंत, दत्तात्रय धायगुडे, रत्नाकर पागडे, संतोष जालगांवकर, शिवदास आग्रे, सुनील साठले, रितेश जाधव, पंकज कदम, संदीप भोसले, प्रवीण रणदिवे, विक्रांत शिंदे, सचिन गुजर, राजाराम गावडे, राजेश सावंत, रवी साळवी, सुयश बाळ, जयवंत चोगले यांचा अपघातग्रस्तांमध्ये समावेश असल्याचे समजते.