|Thursday, July 18, 2019
You are here: Home » मनोरंजन » भव्यदिव्य स्वप्नांचा पाठपुरावा आलिशानमध्ये

भव्यदिव्य स्वप्नांचा पाठपुरावा आलिशानमध्ये 

मराठी नाटक आणि मराठी माणूस यांची एकमेकांची साथ पूर्वापार आहे. मराठी माणूस हा नाटकवेडा आहे, असे पूर्वी म्हटले जायचे. मात्र, सध्या मराठी नाटकांचा प्रेक्षक दिवसेंदिवस रोडावतो आहे, अशी तक्रार नाटय़निर्मात्यांसह अनेक रंगकर्मी करत आहेत. याची कारणे अनेक असली आणि ती सर्वांना माहीत असली तरीही मराठी नाटकांवर रुसलेल्या रसिकांना पुनश्च रंगभूमीकडे वळविण्यासाठी नाटय़सफष्टीत नवनवीन प्रयोग होत आहेत. असाच नवा प्रयोग आलिशान या नाटकाद्वारे करण्यात येणार आहे.

 नाटय़व्यवसायात नवं काही घडवण्याची नाटय़निर्मात्यांची खरोखरच मनापासून इच्छा असेल तर काहीही घडू शकते. नाटक बनवताना, नवनवीन गोष्टी, तंत्रज्ञान यांचा सखोल अभ्यास करून त्यांचा योग्य तो वापर करत अतिशय कल्पकतेने कशाप्रकारे प्रेक्षकांना दिवाणखान्यातून बाहेर काढत एक भव्य दिव्य नजाऱयांची एक चांगली कलाकृती अनुभवायला मिळेल हे व्यवस्थित प्लॅन करून लेखक, दिग्दर्शक क्षितिज झारापकर यांनी एका भव्यदिव्य नाटकाचे स्वप्न पाहिले. या स्वप्नाचा पाठपुरावा करत यो स्टुडिओस प्रस्तुत आणि साक्षी व्हिजन निर्मित आलिशान हे नाटक लवकरच रंगभूमीवर येणार आहे. संगीत नाटकांपासून ते व्यावसायिक नाटकांपर्यंत सर्व स्थित्यंतर आजवर मराठी प्रेक्षकांनी पाहिली आहेत. पण, आलिशान हे नाटक पूर्णपणे वेगळे आहे. मराठी प्रेक्षकांनी आजवर जे कोणत्याही मराठी किंवा हिंदी नाटकांमध्ये अनुभवलं नसेल ते या नाटकामुळे अनुभवायला मिळेल हे नक्की. लेखक-दिग्दर्शक क्षितिज झारापकर, संगीत दिग्दर्शक शैलेंद्र बर्वे, नफत्य दिग्दर्शक मयूर वैद्य, प्रकाशयोजना शीतल तळपदे, वेशभूषा पूर्णिमा ओक अशी दिग्गज नाटककारांची एक टीम या नाटकामागे उभी आहे.