|Tuesday, June 25, 2019
You are here: Home » मनोरंजन » नृत्यांगणा नुपूर दैठणकरची बाजी

नृत्यांगणा नुपूर दैठणकरची बाजी 

झी मराठी वाहिनीवर पेशवाईचा काळ असणारी व उत्कंठावर्धक कथा असलेली ‘बाजी’ ही नवीन मालिका 30 जुलैला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. झी मराठी पुन्हा एकदा शंभर भागांचीच मर्यादित कथा प्रेक्षकांसाठी सादर करणार आहे. पेशवाईच्या उत्तरार्धात मराठेशाही संपवण्यासाठी इंग्रजांनी निजामाशी हातमिळवणी केली होती. त्या काळाचा संदर्भ घेऊन बाजीची काल्पनिक कथा लिहिण्यात आली आहे.

 त्यावेळी शेरा नावाच्या एका हेराला पेशवाईत पाठवण्यात आले होते आणि पेशव्यांना संपवण्यासाठी त्याला शंभर दिवसांची मुदत देण्यात आली होती, असे या मालिकेचे कथानक आहे. या मालिकेत अभिजीत श्वेताचंद्र सोबत नुपूर दैठणकर ही प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. बालपणापासून कलेचा वारसा लाभलेली आणि कलेविषयी प्रेम असणारी क्षत्रिय नफत्यांगना नुपूर दैठणकर आता छोटय़ा पडद्यावर प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. झी मराठीवरील ‘बाजी’ या मालिकेत ती हिराचं पात्र साकारणार आहे. या मालिकेचं चित्रीकरण पुणे, भोर, सातारा आणि सासवड येथे झालं आहे. ही मालिका प्रामुख्याने पेशवाईच्या उत्तरार्धावर आधारित आहे. यात 1770 मधील अनेक खऱया गोष्टी दाखवण्यात येणार आहेत. त्यामध्ये बिनीवाले, कोतवाल, कात्रजचा विष प्रयोग, गोदामाला आग, गणपतीच्या हाराची चोरी आदींचा समावेश आहे. यामध्ये शेराचं पात्र प्रखरसिंग तर बाजीचं पात्र अभिजित श्वेताचंद्र साकारणार आहे. संतोष कोल्हे यांनी या मालिकेसाठी खूप कष्ट घेतल्याचे नुपूरने सांगितले. नुपूर म्हणाली, ही काल्पनिक कथा आहे. यात बाजी व हिराची प्रेमकथा दाखवली आहे. यातील प्रत्येक पात्राला वेगवेगळे कंगोरे आहेत. यात मी लावण्यवती, धाडसी, जिद्दी स्वराज्याचं रक्षण करण्यास मागेपुढे न पाहणारी आणि घोडेस्वारी व तलवारबाजी करणारी दाखवली आहे. ही भूमिका माझ्यासाठी खूपच आव्हानात्मक आहे, असे नुपूर  म्हणते.