|Tuesday, July 16, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » भीषण दुर्घटनेदरम्यान प्रसूती, मातेचा मृत्यू, मुलगी बचावली

भीषण दुर्घटनेदरम्यान प्रसूती, मातेचा मृत्यू, मुलगी बचावली 

 ब्राझिलिया

 ‘देव तारी त्याला कोण मारी’ अशी मराठीत म्हण आहे, या म्हणीचा प्रत्यय ब्राझील येथील दुर्घटनेतून आला आहे. येथे एक गर्भवती महिला ट्रकमधून प्रवास करत होती, प्रवासादरम्यान चालकाने संतुलन गमाविल्याने ट्रक उलटून दुर्घटना घडली. या दुर्घटनेवेळी गर्भवती महिला खाली कोसळली, परंतु तिच्या गर्भातून अर्भक बाहेर निघून नजीकच्या गवतावर पडले. या दुर्घटनेत महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला असला तरीही नवजात मुलीला साधे खरचटले देखील नाही. साओ पावलो आणि क्यूरिटिबा या शहरांदरम्यान ही घटना घडली आहे. या घटनेनंतर तेथे दाखल झालेले आरोग्य कर्मचारी काही मीटर अंतरावर नवजात मुलीला पाहून अवाप् झाले. अद्भूतपणे बचावलेली ही मुलगी एकदम सुदृढ आहे. दुर्घटनेवेळीच मुलीची गर्भनाळ वेगळी झाली होती, असे डॉक्टरांनी सांगितले. या मुलीवर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मृत महिलेची ओळख पटविण्याचा प्रयत्न पोलीस करत आहे. ही महिला कोणत्याही ओळखपत्रांशिवाय ट्रकमधून प्रवास करत होती. या मुलीने संपूर्ण ब्राझीलचे लक्ष वेधून घेतले आहे.