|Tuesday, July 23, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » ठेवींवरील व्याजदरात एसबीआयकडून वाढ

ठेवींवरील व्याजदरात एसबीआयकडून वाढ 

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

देशाची सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने मुदत ठेवींच्या व्याज दरामध्ये वाढ केली आहे. ही वाढ सर्वसामान्य खातेदारांसह ज्येष्ठ नागरिकांनाही लागू करण्यात आली आहे. बँकेने काही मुदत ठेव प्रकारांच्या व्याजदरात वाढ केली आहे. तर काही मुदत ठेव प्रकारच्या व्याज दरात किंचित घट केली आहे.

बँकेने साधारणपणे 0.05 ते 0.1 टक्क्यांपर्यंत व्याजदरात वाढ केली आहे. हे नवीन दर 30 जुलै 2018 पासून लागू होणार आहे. स्टेट बँकेने त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर ही माहिती प्रसिद्ध केली आहे. बँकेने 1 कोटीपेक्षा कमी ठेवींवर मुदत ठेवींसाठी 0.05 ते 0.1 टक्के वाढ केली आहे. 1 ते 10 वर्षे ठेवीसाठी ही वाढ लागू असेल. अन्य ठेवी प्रकारांसाठी 6.7 वरुन 6.85 इतकी प्रतिवर्षासाठी वाढ केली आहे. तर उर्वरित प्रकारातील व्याज दरात कोणताही बदल केलेला नाही. ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या ठेवीवरील व्याज दरातही बदल केला आहे.