|Thursday, April 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » झाली वारी, गेले वारकरी तरीही कचऱयाचे खच ‘जैसे थे’!

झाली वारी, गेले वारकरी तरीही कचऱयाचे खच ‘जैसे थे’! 

तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन टाळल्यास मौखिक कर्करोगापासून  वाचणे शक्य

प्रतिनिधी / सातारा

आँन्को लाईफ कँन्सर सेंटरव्दारे (हेड अँण्ड नेक) मौखिक कर्करोग दिन साजरा.

प्रत्येक वर्षी 27 जुलै हा दिवस जगभरात मौखिक कर्करोग दिन (हेड अँण्ड नेक कँन्सर) म्हणून साजरा केला जातो. शेंद्रे येथील आँन्को लाईफ कँन्सर सेंटरतर्फे या दिनाचे औचित्य साधत रूग्ण तसेच त्यांच्या नातेवाईकांमध्ये मौखिक कर्करोगाबाबत जनजागृती व्हावी या उद्देशाने रूग्णालयातील कर्करोग शल्यचिकित्सक विभाग, दंत विभाग आणि कर्करोग प्रतिबंध विभाग यांच्या संयुक्त सहभागातून मोफत शिबिर करण्यात आले होते. याप्रसंगी रूग्णालयाचे अध्य़क्ष व कार्य़कारी संचालक श्री.उदय देशमुख, कर्करोग प्रतिंबध विभागाचे प्रमुख डाँ.अर्जून शिंदे, कर्करोग शल्यचिकित्सा विभागाचे डाँ.मनोज लोखंडे  रेडीएशन तज्ञ डॉ.करण चंचलानी व दंत विभागाचे प्रमुख डाँ.नकुल परशरामी यांच्यासह रूग्ण तसेच नागरीक मोठय़ा संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी हॉस्पिटल च्या समुपदेशक सौ.निलम राजपूत यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

  कँन्सर हा शब्द ऐकल्यावर अनेकदा रूग्णांचे मनोबल ढासळते. विशेषता समाजात कर्करोगाविषयी अनेक गैरसमज असल्याचे दिसून येते. म्हणूनच आँन्को लाईफ कँन्सर सेटंरच्या माध्यमातून कर्करोगाविषयी जनजागृती व रूग्ण प्रबोधन व्हावे याकरीता विविध कार्य़क्रमाचे आयोजन सातत्याने केले जाते. यावेळी कार्यक्रमाची प्रस्तावना करताना श्री.उदय देशमुख म्हणाले की अत्याधुनिक उपाचार पध्दती व अद्ययावत तंत्रज्ञानाची सांगड घालत उपचार उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न आहे.

 याप्रसंगी उपस्थित 100 हून अधिक नागरिक तसेच रूग्णालयातील कर्मचारी यांची  मौखिक  तपासणी दंतरोग तज्ञ डॉ नकुल परशरामि यांचा  कडून मोफत करण्यात आली. यावेळी उपचार घेत असलेल्या रूग्णांनी कँन्सरविषयी तसेच त्यांना आँन्को लाईफव्दारे दिलेला विश्वास व उपचारपध्दतीचा विशेष दाखला देत डाँक्टरांप्रती सदभावना व्यक्त केली. डाँ.मनोज लोखंडे यांनी मौखिक कर्करोगविषयी काही ठळक मुद्दे अधोरेखित केले. प्रत्येकाने तंबाखूजन्य पदार्थापासून स्वताला मुक्त केले तर नक्कीच तोंडाचा कर्करोग होण्यापासून स्वताचे रक्षण करू शकतो. तसेच,कोणतीही लक्षणे दिसल्यास वेळ वाया न घालवता योग्य डाँक्टरांची भेट घेणे आवश्यक आहे.” वेळीच निदान व योग्य उपचार हाच कँन्सर पासून जीवदानाचा पक्का उपाय असे म्हणावे लागेल .”

 

Related posts: