|Monday, April 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » आज अंगारकी संकष्टी

आज अंगारकी संकष्टी 

प्रतिनिधी/ पणजी

हिंदू धर्मातील सर्वांचे लाडके दैवत आणि त्याचबरोबर काही परधर्मिंयांनाही प्रिय असलेले श्रीगणेश यांची आज मंगळवार 31 जुलै रोजी अंगारकी संकष्टी साजरी करण्यात येत आहे. यावेळच्या संकष्टीचे महत्व म्हणजे गेल्या अनेक वर्षांनंतर प्रथमच यावर्षी जुलै महिन्यात या एका महिन्यात दोन संकष्टी आलेल्या आहेत. पहिली संकष्टी 1 जुलै रोजी झाली तर आज 31 जुलै रोजी दुसरी अंगारकी संकष्टी साजरी करण्यात येत आहे. आज रात्री 9.36 वाजता चंद्रोदय होणार असून त्यानंतर गणेशभक्त आपला उपवास सोडण्यास मोकळे असतील. या दरम्यान आज राज्यात दिवसभर ठिकठिकाणच्या गणेश मंदिरांमध्ये विविध धार्मिक विधी, भजन व अन्य सांस्कृतिक कार्यकम, आरत्या, तीर्थ प्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

Related posts: