|Friday, July 19, 2019
You are here: Home » Top News » जमीन खरेदीसाठी कोकणात गेलेल्या महिलेची हत्या

जमीन खरेदीसाठी कोकणात गेलेल्या महिलेची हत्या 

ऑनलाईन टीम / रत्नागिरी :

जमीन खरेदीच्या व्यवहारासाठी मुंबईतून कोकणात गेलेल्या एका महिलेची हत्या झाल्याचा प्रकार रत्नागिरीतील संगमेश्वर तालुक्मयात घडला असून मृत महिलेचे नाव स्मिता कुसूरकर असे आहे. त्यांचा मृतदेह संगमेश्वरजवळय़ा चिरेखाणीत आढळला. पोलिसांनी या प्रकरणी श्रीकांत घडशी या इसमाला अटक केली आहे.

मुंबईतील एका खाजगी कंपनीतून वरि÷ पदावरुन दोन वर्षांपूर्वी निवृत्त झालेल्या स्मिता कुसूरकर 11 जुलै रोजी एका जमिनीच्या व्यवहारासाठी कोकणात जात असल्याचे सांगत घरातून निघाल्या होत्या. मात्र 16 जुलैपर्यंत त्या मुंबईत न परतल्याने आणि त्यांचा मोबाईलही बंद लागल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी मुंबईतील ना म जोशी मार्ग पोलिस स्थानकात त्या बेपत्ता असल्याची तक्रार दिली होती. यानंतर हा तपास रत्नागिरीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषक विभागाकडे आला. तपासात स्मिता कुसूरकर यांचा मोबाईल शेवटचा रत्नागिरीमध्ये वापरल्याचे समोर आले. शेवटचे संभाषण संगमेश्वर इथल्या श्रीकांत घडशी या इसमाशी झाल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी श्रीकांत घडशीचा माग काढल्यावर तो गायब असल्याचे समजले. रत्नागिरी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने सापळा रचून मुंबईतून पकडले. यानंतर आपणच स्मिता कसूरकर यांची हत्या केल्याची कबुलही दिली. स्मिता कसूरकर यांची हत्या करुन मृतदेह संगमेश्वर नजीकच्या चिरे खाणीत टाकल्याचे त्याने सांगितले. पोलिसांनी चिरे खाणीतून मृतदेह बाहेर काढून तो स्मिता कसूरकर यांच्या कुटुंबीयांच्या ताब्यात दिला. स्मिता कसूरकर यांनी जमीन व्यवहारात काही लाख रुपये अदा केल्याची माहिती पुढे आले आहे. दरम्यान त्यांची हत्या करणाऱया श्रीकांत घडशी याच्यावर याआधी स्वतःच्या पत्नीची हत्या केल्याचा आरोप आहे.