|Wednesday, June 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » भविष्यात जमीन वाढणार नाही तर कौटुंबिक कारणामुळे ती कमी होणार

भविष्यात जमीन वाढणार नाही तर कौटुंबिक कारणामुळे ती कमी होणार 

प्रतिनिधी/ कुरूंदवाड

जैन समाज हा काबाडकष्ट करणारा अल्पसंख्येक समाज आहे. हा समाज शेतीवर अवलंबून आहे. भविष्यात जमीन वाढणार नाही तर कौटुंबिक कारणामुळे ती कमी होणार आहे. त्या जमिनीतील उत्पन्न वाढवले पाहिजे यासाठी आधुनिक पद्धतीने शेती करणे आवश्यक आहे. जैन समाजातील मुलांनी मुख्यत्वे शिकले पाहिजे. शिक्षणाशिवाय पर्याय नाही याची जाणीव असणे गरजे आहे, असे प्रतिपादन माजी खासदार कल्लापाण्णा आवाडे यांनी कुरुंदवाड येथे व्यक्त केले.

कुरुंदवाड येथील विजयाताई पाटील यांची दक्षिण भारत जैन सभेच्या वीर महिला मध्यवर्ती समितीच्या अध्यक्षपदी तसेच बोरगाव तालुका चिकोडी कर्नाटक येथील रावसाहेब पाटील बोरगावकर यांची दक्षिण भारत जैन सभेच्या अध्यक्षपदी फेरनिवड झाली. याबद्दल या दोघांचा सत्कार आवडे यांच्याहस्ते करण्यात आला. दोघांनाही मानपत्र, शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन गौरवण्यात आले. कुरुंदवाड येथील जैन समाजाने हा कार्यक्रम आयोजित केला होता.

आवाडे म्हणाले, जैन समाज सर्वत्र विखुरला आहे. दक्षिण भारत जैन सभेच्या स्थापनेनंतर समाजात बदल झाला आहे. प्रत्येक गावाच्या वेशीवर धाबे निर्माण झाले आहेत. या जागेवर जैन झाले आहेत. या धाब्यावर जैन युवकांची संख्या जादा आहे. याचे आत्मपरीक्षण करणे आवश्यक आहे.

रावसाहेब  पाटील  बोरगावकर म्हणाले, समाजातील नवीन पिढीने समाजाचे नेतृत्व करावे, अन् समाजाला पुढे न्यावे. ग्रामीण भागात जैन समाज दारिद्रयात जगत आहे. युवकांनी शिक्षणाकडे लक्ष द्यावे, समाजातील सर्वांना शिक्षण मिळावे, यासाठी आग्रही असावे. दक्षिण भारत जैन सभा समाजाच्या उत्कर्षासाठी सर्वोतपरी प्रयत्न करत आहे. यामध्ये सर्वांचा सहभाग असावा, असे त्यांनी सांगितले.

यावेळी सत्कारमूर्ती विजयाताई पाटील, विमल पाटील, यांची भाषण झाली. सचिन गुदले आणि माणिक नागवे यांनी मानपत्र वाचन केले. स्वागत धनपाल आलासे तर प्रास्ताविक दादासो पाटील यानी केले

यावेळी जेष्ठ नेते माजी नागराध्य रावसाहेब पाटील, बाळासाहेब  दिवटे, जवाहर पाटील, उनगराध्यक्ष अक्षय आलासे, अभिजित पाटील, किरण आलासे, आण्णासो गुदले, महावीर पोमाजे, महावीर गाडवे, अरुण आलासे, सौ सुशीला भबीरे, सुनंदा आलासे आदी उवस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दिप प्रजवलन व प्रतिमा पूजन करण्यात आले. विविध व्यक्ती महिलांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. आभार त्रिशला पाटील यांनी मानले.