|Thursday, August 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » सणगर समाजाच्या प्रगतीसाठी सर्वोतोपरी सहकार्य : शिवेंद्रराजे

सणगर समाजाच्या प्रगतीसाठी सर्वोतोपरी सहकार्य : शिवेंद्रराजे 

सातारा  /

श्रीक्षेत्र पंढरपूर येथील सणगर समाज मठाचे नूतनीकरण आणि विस्तारीकरण, तसेच साताऱयात सणगर समाजासाठी सर्वसोयीनियुक्त समाजमंदीर उभरण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. तसेच सणगर समाजाच्या सर्व समस्या सोडवण्यासाठी विविधमंडळात आवाज उठवणार असून या समाजातील प्रत्येक घटकाच्या प्रगतीसाठी सर्वोतोपरी सहकार्य करणार असल्याची ग्वाही आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली. 

सातारा येथील निर्मल मंगल कार्यालय अखिल भारतीय सणगर समाजाच्या 30 त्रैवार्षिक मेळाव्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष भरतशेठ राऊत, उपाध्यक्ष अनील राऊत, सचिव एन. आर. बदडे, काशिनाथ कचरे, आनंदराव नवाळे, नामदेवराव सासणे, प्रसाद कारंडे, र्कीमंताव राऊत, सूर्यकांत कारंडे, डॉ. झुंजारराव बदडे, विजय सणगर, प्रमोद गोंजारी आदी मान्यवरांची प्रमख उपस्थिती होती. 

समाजाच्या समस्या सोडवणार

शिवेंद्रसिंहराजे पुढे म्हणाले, स्व. भाऊसाहेब महाराजांच्या कार्यकाळापासून आजही सणगर समाजबांधव आपच्या कुटुंबीयांवर प्रेम करत आहेत. आमदार म्हणून मी नेहमीच या समाजाच्या समस्या सोडवण्यासाठी पाठीशी उभा असतो. 

सूत्रसंचालन उमेश गोंजारी यांनी केले तर बाळासाहेब माचणे यांनी प्रास्ताविक केले. नितीन कुमार शेंड यांनी आभार मानले. यावेळी रंजना नवाळे, कांचन बल्लाळ, लता डमकले या महिला प्रतिनिधींसह समाजबांधव मोठय़ा संख्येने उपस्थित होते.